Corona Virus : रशियात कोरोना बेलगाम! 24 तासांत 1000 हून अधिक मृत्यू, एक आठवड्याची पगारी सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 17:37 IST2021-10-21T17:36:04+5:302021-10-21T17:37:30+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी पुतीन यांनी लसीकरणाच्या संथ गतीला जबाबदार धरले आहे. रशियामध्ये स्पुतनिक-व्ही लसीची उपलब्धता असूनही, येथे केवळ 35% लोकांचेच संपूर्ण लसीकरण होऊ शकले आहे. गेल्या काही आठवड्यांत येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Corona Virus : रशियात कोरोना बेलगाम! 24 तासांत 1000 हून अधिक मृत्यू, एक आठवड्याची पगारी सुट्टी जाहीर
आता रशियामध्ये (Russia) कोरोना विषाणूचा कहर झपाट्याने वाढताना दिसत आहे. येथे गेल्या 24 तासांत 1024 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (vladimir putin) यांनी कर्मचाऱ्यांना एक आठवड्याची पगारी रजा जाहीर केली आहे. एवढेच नाही, तर नागरिकांनी जबाबदारीने पुढे यावे आणि लस घ्यावी, असे आवाहन पुतीन यांनी केले आहे. (Corona Virus In Russia)
पुतीन यांनी 30 ऑक्टोबरपासून देशभरात एक आठवड्याची पगारी सुट्टी जाहीर करण्याच्या सरकारच्या योजनेला मंजुरी दिली आहे. पुतीन म्हणाले, याचा मुख्य उद्देश लोकांचे जीवन आणि आरोग्याचे संरक्षण करणे आहे.
रशियात केवळ 35% लोकांचेच संपूर्ण लसीकरण -
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी पुतीन यांनी लसीकरणाच्या संथ गतीला जबाबदार धरले आहे. रशियामध्ये स्पुतनिक-व्ही लसीची उपलब्धता असूनही, येथे केवळ 35% लोकांचेच संपूर्ण लसीकरण होऊ शकले आहे. गेल्या काही आठवड्यांत येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.
नागरिकांनी जबाबदारीने लस घ्यावी -
पुतीन सातत्याने लोकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन करत आहेत. बुधवारीही त्यांनी पुन्हा एकदा नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. तसेच लोकांनी जबाबदारीने समोर यावे आणि लस घ्यावी, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. रशियात बुधवारी कोरोनाचे 34000 नवे रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत येथे 226,353 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या युरोपमधील कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे.