सावधान! मास्कवर एक आठवडा जिवंत राहातो कोरोना व्हायरस, असा आहे त्याचा इतर गोष्टींवर राहण्याचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 10:58 AM2020-04-07T10:58:22+5:302020-04-07T13:09:25+5:30

हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी, रूमच्या तापमानत अनेक गोष्टींवर कोरोना व्हायरस किती काळ सक्रीय राहतो यासंदर्भात अभ्यास केला. यात हा व्हायरस लाकडावर आणि कपड्यांवर एक दिवस जिवंत राहतो.

Corona virus remains active for a week on mask sna | सावधान! मास्कवर एक आठवडा जिवंत राहातो कोरोना व्हायरस, असा आहे त्याचा इतर गोष्टींवर राहण्याचा काळ

सावधान! मास्कवर एक आठवडा जिवंत राहातो कोरोना व्हायरस, असा आहे त्याचा इतर गोष्टींवर राहण्याचा काळ

Next
ठळक मुद्देहाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी केले संशोधनअनुकूल परिस्थितीत अधिक काळ जिवंत राहतो कोरोना व्हायरस मास्कच्या वरच्या बाजूला चुकूणही हात लाऊ नका

हाँगकाँग: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क सर्वात उपयोगी असल्याचेही सांगण्यात येत आहे. अशातच, कोरोना व्हायरस हा मास्कच्या बाहेरील बाजूस जवळपास एक आठवडा जिवंत राहतो. तर चलनी नोटा, स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकवर तर तो अनेक दिवस जिवंत राहू शकतो, अशी धक्कादायक बाब कोरोना व्हायरससंदर्भात करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आली आहे. असे असले, तरी घरातील ब्लिच आणि साबनाने नेहमी नेहमी आत धून त्याला याचा धोका टाळता येऊ शकतो.

हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी, रूमच्या तापमानत विविध गोष्टींवर कोरोना व्हायरस किती काळ सक्रीय राहतो यासंदर्भात अभ्यास केला. यात हा व्हायरस लाकडावर आणि कपड्यांवर एक दिवस जिवंत राहतो. काच आणि चलनी नोटांवर तो चार दिवस जिवंत राहतो. तर स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकवर तो पूर्णपणे नष्ट होण्यासाठी चार ते सात दिवस लागता. 

सर्वात चिंताजन आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा व्हायरस मास्कच्या बाहेरील बाजूवर सात दिवसांपर्यंत जिवंत राहतो, असे या संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे जेव्हा आपण मास्कचा वापर करता, तेव्हा त्याच्या वरच्या बाजूला चुकूणही हात लाऊ नका. असे झाल्यास हे संक्रमण तुमच्या हातापासून तोंड आणि नाकापर्यंतही पोहोचू शकते.

हाँगकाँग विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या लियो पून लिटमॅन मलिक पिरिस यांनी म्हटले आहे, की अनुकूल परिस्थिती असेल तर हा व्हायरस फार अधिक काळ जिवंत राहतो. असे असले तरी आपण किटक नाशकांच्या माध्यमाने त्याला मारू शकतो. याशिवाय संशोधकांनी म्हटले आहे, की इतर गोष्टींवर हा व्हायरस काही काळानंतर वेगाने नष्ट होतो. हे संशोधन लॅबमध्ये अत्यंत सुरक्षितपणे आणि न हात लावता करण्यात आले आहे. मात्र या निष्कर्शावरून, अशा गोष्टींच्या संपर्कात आल्याने एखाद्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता कितपत असते हे सांगता येणार नाही.

यापूर्वी गेल्या महिन्यात नॅचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एक अमेरिकन संशोधकाच्या रिपोर्टप्रमाणे विविध गोष्टींवर कोरोना किती काळ जिवत राहतो यासंदर्भात भाष्य करण्यात आले होते. त्यातप्लास्टिक आणि स्टीलवर हा व्हायरस 72 तास तर तांब्याच्या वस्तूर 24 तास जिवंत राहतो असे सांगण्यात आले होते. याशिवाय आपण आपले हात वारंवार धुणे आणि तोंड व डोळ्यांना कमितकमी स्पर्ष करणे हाच कोरोनावरील जालीम उपाय आहे, असेही या संशोधकाने म्हटले होते.

Web Title: Corona virus remains active for a week on mask sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.