...तर कोरोना विषाणूची संसर्गक्षमता २० मिनिटांत ९० टक्क्यांपर्यंत कमी होते, अहवालातून स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:13 AM2022-01-13T09:13:11+5:302022-01-13T09:13:21+5:30

कोरोना महासाथीचा उगम झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत या महासाथीच्या विषाणूवर बरेच संशोधन झाले आहे.

Corona virus infection is reduced by 90% in 20 minutes, research shows | ...तर कोरोना विषाणूची संसर्गक्षमता २० मिनिटांत ९० टक्क्यांपर्यंत कमी होते, अहवालातून स्पष्ट

...तर कोरोना विषाणूची संसर्गक्षमता २० मिनिटांत ९० टक्क्यांपर्यंत कमी होते, अहवालातून स्पष्ट

googlenewsNext

कोरोना महासाथीचा उगम झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत या महासाथीच्या विषाणूवर बरेच संशोधन झाले आहे. ब्रिटनमधील ब्रिस्टॉल विद्यापीठाने अलीकडेच केलेल्या एका संशोधनात हवेत पसरल्यानंतर कोरोना विषाणूची संसर्गक्षमता  २० मिनिटांत ९० टक्क्यांपर्यंत कमी होते, असे स्पष्ट झाले आहे.

काय सांगतो अहवाल?

ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या एअरोसोल रिसर्च सेंटरतर्फे कोरोना विषाणूवर संशोधन करण्यात आले.या संशोधनात कोरोना विषाणू 
हवेत पसरल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत निष्प्रभ होतो, असे स्पष्ट झाले आहे. हवेत पसरल्यानंतर कोरोना विषाणूची संसर्गक्षमता ९० टक्क्यांपर्यंत  कमी होते, असेही अभ्यासातून आढळून आले आहे.

कोरोना विषाणू हवेत पसरल्यानंतर नेमके काय होते, याचे प्रात्यक्षिक विद्यापीठाच्या संशोधन पथकाने केले.या प्रात्यक्षिकासाठी संशोधकांनी एक उपकरण विकसित केले. त्यात कोरोना विषाणूच्या अवशेषांची निर्मिती केली.या अवशेषांना दोन इलेक्ट्रिक रिंगमध्ये पाच सेकंद ते २० मिनिटांपर्यंत प्रवाहित करण्यात आले. अत्यंत नियंत्रित वातावरणात हा प्रयोग करण्यात आला.

काय आढळले अभ्यासात?

विषाणू जेव्हा फुफ्फुसााबाहेर पडतात, तेव्हा त्यांच्यातील पाणी नष्ट होते. तसेच हवेतील कार्बन डायऑक्साइडचा विषाणूवर विपरित परिणाम होतो. या दोन्ही कारणांमुळे विषाणूची संसर्गक्षमता कमालीची घटते. २० मिनिटांत हा बदल घडून येतो, असे या अभ्यासात आढळले. मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग या दोन नियमांचे काटेकोर पालन केल्यास हवेतील विषाणू निष्प्रभ ठरून त्याची संसर्गक्षमता मरून जाईल, असा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आला.

 

Web Title: Corona virus infection is reduced by 90% in 20 minutes, research shows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.