शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

Corona Vaccine: लसीची ढाल कोरोनाला किती दिवस रोखणार? समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 8:27 AM

Corona Vaccine News: कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते, हे स्पष्ट होत असतानाच आता लसीचा प्रभाव फार फार तर १० आठवड्यांपर्यंत टिकतो त्यानंतर शरीरातील अँटिबॉडीज कमी होऊ लागतात

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते, हे स्पष्ट होत असतानाच आता लसीचा प्रभाव फार फार तर १० आठवड्यांपर्यंत टिकतो त्यानंतर शरीरातील अँटिबॉडीज कमी होऊ लागतात, असे संशोधक म्हणू लागले आहेत. अशा परिस्थितीत बूस्टर डोस घेणे गरजेचे ठरू लागते. 

 काय सांगतात ब्रिटिश संशोधक?युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन या संस्थेतील संशोधकांनी कोरोना विषाणूवर केलेल्या संशोधनाचा अभ्यास अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटल्यानुसार कोरोनाप्रतिबंधक लसींचा प्रभाव दहा आठवड्यांपर्यंत टिकतो. त्यानंतर शरीरात लसीमुळे निर्माण झालेल्या अँटिबॉडीज घटू लागतात. संशोधकांच्या चमूने ५० ते ७० वर्षांदरम्यानच्या लसवंत अशा ६०५ लोकांचे रक्त तपासणीसाठी घेतले. त्यात सर्वजणांच्या अँटिबॉडीजचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले. मात्र, अँटिबॉडीजचे प्रमाण कमी झाल्याने चिंतित होण्याची आवश्यकता नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. परंतु कोरोनाशी लढण्यासाठी अँटिबॉडीजची ढाल असणे गरजेची असली तरी संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्तीकडे अन्य शस्त्रेही असल्याचे संशोधक म्हणतात.  मेमरी बी पेशी संसर्गाला लक्षात ठेवून त्याला प्रतिरोध करण्यासाठी तातडीने अँटिबॉडी तयार करण्याच्या कामाला लागतात. 

बूस्टर डोसची गरज लागू शकते का?संशोधकांनी फायझर आणि ॲस्ट्राझेनेका लसींच्या परिणामकारकतेचे परीक्षण केले आहे.  -त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी कोरोनावर लस बाजारात आली त्यावेळी सर्वप्रथम लस घेतली असेल त्यांना काही महिन्यांनंतर बूस्टर डोस घेणे गरजेचे आहे. -अँटिबॉडीजचे प्रमाण घटू लागले तर लसीमुळे प्राप्त झालेले सुरक्षा कवचही क्षीण होऊ लागते. त्यामुळे बूस्टर डोसची आवश्यकता भासू लागते.  

बूस्टर डोस आणि जगातील सद्य:स्थिती लसीचा तिसरा डोस म्हणून बूस्टर डोसकडे पाहिले जाते.  इस्रायलमध्ये नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकी प्रशासनानेही बूस्टर डोसची गरज भासण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.भारताने सर्वप्रथम संपूर्ण लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. त्यानंतर संशोधन करूनच बूस्टर डोसविषयी निर्णय घेतला जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने  बूस्टर डोस किती गरजेचा आहे,  यावर अद्यापपर्यंत  भाष्य करणे टाळले आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय