CoronaVirus in China: चीनमध्ये कोरोना पुन्हा परतला; मोठे शहर लॉकडाऊन, प्रांतामध्ये निर्बंध 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 02:21 PM2021-06-01T14:21:40+5:302021-06-01T14:22:20+5:30

CoronaVirus in China: बाजारपेठा, चाईल्ड केअर सेंटर आणि मनोरंजन केंद्रे बंद करण्यात आली आहेत. रेस्टॉरंट, स्कूलदेखील बंद करण्यात आल्या आहेत. ग्वांगदोंगमध्ये विमान, ट्रेन आणि बसद्वारे ये-जा करण्यासाठी मागील 72 तासांत केलेली कोरोना चाचणी रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. 

Corona returned to China; Large city lockdown, restrictions in the province | CoronaVirus in China: चीनमध्ये कोरोना पुन्हा परतला; मोठे शहर लॉकडाऊन, प्रांतामध्ये निर्बंध 

CoronaVirus in China: चीनमध्ये कोरोना पुन्हा परतला; मोठे शहर लॉकडाऊन, प्रांतामध्ये निर्बंध 

googlenewsNext

Corona Virus status in China: जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रसार करणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोना परतला आहे. जगभरात जवळपास 35 लाखांवर लोकांनी कोरोनामुळे प्राण सोडले आहेत. कोरोनाचा जिथे जन्म झाला होता, त्या चीनमध्ये पुन्हा कोरोना पसरू लागला आहे. कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने चीनमध्ये ग्वांगदोंग भागात अनेक निर्बंध लादले आहेत. (Corona Virus return in China, Lockdown in Guangzhou, restrictions in Guangdong province)

CoronaVirus: निरागसांना कोण समजावणार? कोणी आई, तर कोणी बाप गमावला; कोरोनाच्या संकटात 1742 मुले अनाथ


वृत्तसंस्था रॉय़टर्सनुसार 31 मे रोजी चीनमध्ये 23 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्याच्या आदल्या दिवशी 27 नवे रुग्ण सापडले होते. यापैकी एक डझन रुग्ण हे दक्षिण ग्वांगदोंग भागाताली आहेत. हा प्रांत हॉंगकाँगला लागून आहे. यामुळे या भागात लॉकडाऊन सदृष्य स्थिती आहे. तर प्रांताची राजधानी ग्वांगझूमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. इतर भागात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. (China re-imposes travel curbs on province after rise in coronavirus cases)


चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनेदेखील याचे वृत्त दिले आहे. ग्वांगझूमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. यामुळे तेथील बाजारपेठा, चाईल्ड केअर सेंटर आणि मनोरंजन केंद्रे बंद करण्यात आली आहेत. रेस्टॉरंट, स्कूलदेखील बंद करण्यात आल्या आहेत. ग्वांगदोंगमध्ये विमान, ट्रेन आणि बसद्वारे ये-जा करण्यासाठी मागील 72 तासांत केलेली कोरोना चाचणी रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. 


ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना व्हायरस 
ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाने सांगितले की, देशातील दुसरे सर्वात मोठ्या शहरातील नर्सिंग होमला कोरोनाने वेढले आहे. अनेक कर्मचारी, रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. यामुळे व्हिक्टोरिया प्रांताची राजधानी मेलबर्नमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. वृद्धाश्रमांमध्ये देखील कोरोना वाढू लागल्याने व्हिक्टोरिया सरकार चिंतेत आले आहे. 

Web Title: Corona returned to China; Large city lockdown, restrictions in the province

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.