शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोरोना संकट; भारताला मदत न करण्यावरून वादात सापडलेल्या अमेरिकन सरकारनं अखेर तोंड उघडलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 13:36 IST

अमेरिकन राष्ट्रीय सरक्षण सल्लागार जेक सुलिवन यांनी म्हटले आहे, की भारतातील कोरोनाचा प्रकोपामुळे अमेरिका अत्यंत चिंतित आहे. आम्ही आपला मित्र आणि सहकारी असलेल्या भारताला अधिक पुरवठा आणि समर्थन देण्यासाठी चोवीस तास काम करत आहोत. 

वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. असे असतानाच भारताला मदत न करण्यावरून वादात सापडलेल्या अमेरिकेतील बायडेन सरकारने पहिल्यांदाच तोंड उघडले आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, अँटनी ब्लिंकेन म्हणाले,  त्यांच्या संवेदना भारतीयांसोबत आहेत. ते म्हणाले आम्ही भारत सरकारसोबत एकत्रितपणे काम करत आहोत. तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण सल्लागार जेक सुलिवन यांनीही भारताप्रति सहानुभूती दाखवत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. (Corona outbreak America facing criticism over not helping india says we will rapidly deploy additional support to our friend)

काय म्हणाले परराष्ट्रमंत्री -अँटनी ब्लिंकेन म्हणाले, भारतातील कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता, आम्ही आणखी शक्तीनिशी भारतासोबत उभे आहोत. याबाबतीत आम्ही आपला भागीदार असलेल्या भारत सरकारसोबत एकत्रितपणे काम करत आहोत. आम्ही भारत आणि भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी लवकरात लवकर पावले उचलू.

CoronaVirus: संकट काळात अमेरिकेनं फिरवली पाठ, तर भारताच्या 'या' खास मित्रानं पुढे केला मदतीचा हात!

24 तास काम सुरू - अमेरिकन राष्ट्रीय सरक्षण सल्लागार जेक सुलिवन यांनी म्हटले आहे, की भारतातील कोरोनाचा प्रकोपामुळे अमेरिका अत्यंत चिंतित आहे. आम्ही आपला मित्र आणि सहकारी असलेल्या भारताला अधिक पुरवठा आणि समर्थन देण्यासाठी चोवीस तास काम करत आहोत. 

लशीच्या कच्च्या मालावरील बंदी अमेरिका हटवणार?अमेरिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर, बायडेन प्रशासन कोरोना लशीच्या निर्यातीत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातीवर घातलेली बंदी हटवू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांच्यासोबत लशीच्या कच्च्या मालासंदर्भात चर्चा केली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनीही अमेरिकेचे उप सचिव वेंडी शेरमन यांच्यासोबत ही बंदी हटविण्यासंदर्भात चर्चा केली आहे.

Mann Ki Baat: लशीसंदर्भातील कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका, लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घ्या; PM मोदींचं आवाहन

रशियाचा मदतीचा हात - सध्या भारतात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हाहाकार माजला आहे. यातच, रशियाने भारताला कोरोना संकटाचा सामना करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रशियाकडून ऑक्सीजन काँसंट्रेटर्स आणि टँक विकत घेण्याचा विचार करत आहे. जर हा प्लॅन आमलात आलाच तर सध्या ऑक्सिजन संकटाचा सामना करत असलेल्या भारताला मोठा दिलासा मिळेल.चीननेही दिलाय मदतीचा प्रस्ताव -तत्पूर्वी, चीननेही भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी भारताला मेडिकल सप्लाय करण्यास तयार आहोत, असे चीनने गुरुवारी म्हटले होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे भारतातील मेडिकल ढांचा कमकूवत होऊ लागला आहे. भारतातील महामारीच्या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन यांनी म्हटले होते, की चीन मदतीसाठी तयार आहे. कोरोना व्हायरस हा मानवतेचा शत्रू आहे. त्याचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्रित येण्याची आवश्यकता आहे.

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

पाकिस्तानातील एधी फाउंडेशनचे पंतप्रधानांना सहकार्या करण्यासंदर्भात पत्र -पाकिस्तानातील एधी फाउंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले असल्याची माहिती मिळाली आहे. हे पत्र सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे. फैजल एधी, एधी फाऊण्डेशनचा कार्यकारी ट्रस्टी स्वत: माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो. आताची परिस्थिती गंभीर आहे, याची आम्हाला जाणीव असल्यानेच आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, असे या पत्रात म्हटले आहे.

भारताच्या मदतीसाठी फ्रान्स तयार -भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा संदेश ट्वीट केला आहे. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील नागरिकांना मी एकत्र राहण्याचा संदेश देत आहे. संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत उभा आहे. या महासाथीनं कोणालाही सोडलं नाही. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत," असा विश्वास इमॅन्युअल मॅक्राँ यांनी दिला आहे.

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती

ऑस्ट्रेलियानंही पुढे केला मदतीचा हात -"भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया भारतातील आपल्या मित्रांसाठी उभा आहे. भारत किती खंबीर आहे हे आम्हाला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी या जागतिक आव्हानावर एकत्र काम करत राहू," असं स्कॉट मॉरिसन म्हणाले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसrussiaरशियाAustraliaआॅस्ट्रेलियाFranceफ्रान्स