Mann Ki Baat: लशीसंदर्भातील कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका, लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घ्या; PM मोदींचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:21 PM2021-04-25T12:21:21+5:302021-04-25T12:22:07+5:30

मोदी म्हणाले, 'आज कोरोना आपल्या  सर्वांचे धैर्य आणि आपल्या सर्वांच्या दुःख सहन करण्याच्या क्षमतेची परीक्षा घेत आहे...

Mann ki baat 76th episode PM Narendra Modi on Corona Virus and Corona vaccine | Mann Ki Baat: लशीसंदर्भातील कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका, लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घ्या; PM मोदींचं आवाहन

Mann Ki Baat: लशीसंदर्भातील कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका, लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घ्या; PM मोदींचं आवाहन

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या 76 व्या अॅपिसोडच्या माध्यमाने देशाला संबोधित केले. मोदी म्हणाले, 'आज कोरोना आपल्या  सर्वांचे धैर्य आणि आपल्या सर्वांच्या दुःख सहन करण्याच्या क्षमतेची परीक्षा घेत आहे, अशा वेळी मी आपल्याशी मन की बातच्या माध्यमाने संवाद साधत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशात एक आत्मविशास संचारला होता. मात्र, या दुसऱ्या लाटेने देशाला मोठा हादरा दिला आहे.' (Mann ki baat 76th episode PM Narendra Modi on Corona Virus and Corona vaccine)

CoronaVirus: संकट काळात अमेरिकेनं फिरवली पाठ, तर भारताच्या 'या' खास मित्रानं पुढे केला मदतीचा हात!

मोदी म्हणाले, 'आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्यालाच अधिक प्राधान्य द्यायचे आहे. भारत सरकार संपूर्ण शक्तीनिशी राज्य सरकारांसोबत उभी आहे. राज्य सरकारेदेखील आपले कर्तव्य पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका
मोदी म्हणाले, कोरोनाच्या या काळात लशीला किती महत्व आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे लशीसंदर्भात कुठल्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेऊ नका. केंद्र सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरविण्यात आली आहे, तिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता 1 मेपासून देशात 18 वर्षांवरील सर्वांनाच लस उपलब्ध होणार आहे.

CoronaVirus : IPS अधिकारी बनला देवदूत, मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले 78 रुग्ण

तज्ज्ञांचाच सल्ला घ्या -
यावेळी मोदींनी देशातील जनतेला आग्रहाची विनंती केली, की आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल, तर आपण केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फॅमिली डॉक्टर्स किंवा तुमच्या जवळपासच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या. मी पाहत आहे, की आपले अनेक डॉक्टर्स यासंदर्भात जबाबदारी स्वीकारत आहेत. अनेक डॉक्टर्स सोशल मिडियाच्या माध्यमानेही जनतेला माहिती देत आहेत.

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी संवाद -
यावेळी मोदींनी काही डॉक्टरांशीही संवाद साधला. तसेच त्यांनाही देशवासीयांशी संवाद साधायला सांगितले. यात, मुंबईच्या लिलावती रुग्णालयाती डॉक्टर शशांक जोशी आणि श्रीनगरचे डॉ. नाविद यानी जनतेशी संवाद साधला.

Web Title: Mann ki baat 76th episode PM Narendra Modi on Corona Virus and Corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.