कोरोना पुन्हा परतला! 'सिकाडा' व्हेरिएंटचा अमेरिकेसह युरोपात वेगाने प्रसार, भारतासाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:27 IST2026-03-31T16:27:10+5:302026-03-31T16:27:42+5:30

लस अद्यापही गंभीर संसर्गापासून संरक्षण देत असली, तरी अपडेटेड बूस्टर डोस घेणे फायदेशीर ठरू शकते. नवीन व्हेरिएंट्स येतच राहणार आहेत. यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे.

Corona is back again Cicada variant is spreading rapidly in Europe including America, a warning sign for India Know the symptoms | कोरोना पुन्हा परतला! 'सिकाडा' व्हेरिएंटचा अमेरिकेसह युरोपात वेगाने प्रसार, भारतासाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या लक्षणं

कोरोना पुन्हा परतला! 'सिकाडा' व्हेरिएंटचा अमेरिकेसह युरोपात वेगाने प्रसार, भारतासाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या लक्षणं

जगभरात कोरोना व्हायरसच्या एका नवा व्हेरिअंट पुन्हा एकदा धास्ती निर्माण केली आहे. अमेरिकेमध्ये कोविड-१९ चा नवीन सबव्हेरिएंट 'BA.3.2' समोर आला असून, याला 'सिकाडा' (Cicada) असे नाव देण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेला हा व्हेरिएंट आता मार्च २०२६ पर्यंत अमेरिकेतील २५ राज्यांमध्ये पसरला आहे. एवढेच नाही तर, जर्मनी, डेन्मार्क आणि नेदरलँडसारख्या युरोपीय देशांमध्येही याचा संसर्ग ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला 'व्हेरिअंट अंडर मॉनिटरिंग' (VUM) श्रेणीत ठेवले आहे.

काय आहे 'सिकाडा' व्हेरिएंट?
हा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचाच वंशज आहे. याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये ७० ते ७५ म्यूटेशन्स झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला हा विषाणू आता २० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी, २०२५-२६ च्या हिवाळ्यातील इतर व्हेरिएंट्सच्या तुलनेत तो अधिक गंभीर आजार निर्माण करत असल्याचे अद्याप दिसून आलेले नाही.

लक्षणे आणि खबरदारी
या व्हेरिएंटची लक्षणे जुन्या ओमिक्रॉन स्ट्रेनशी मिळतीजुळती आहेत. यामध्ये प्रामुख्याने घसा खवखवणे, कोरडा खोकला, थकवा, अंगदुखी, ताप आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. यापासून बचावासाठी नियमित हात धुणे, लक्षणे आढळल्यास इतरांपासून दूर राहून घरीच विश्रांती घेणे आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लस अद्यापही गंभीर संसर्गापासून संरक्षण देत असली, तरी अपडेटेड बूस्टर डोस घेणे फायदेशीर ठरू शकते. नवीन व्हेरिएंट्स येतच राहणार आहेत. यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे.
 

Web Title : कोरोना का 'सिकाडा' वेरिएंट: वैश्विक प्रसार, भारत के लिए चिंता

Web Summary : ओमिक्रॉन का उपप्रकार 'सिकाडा' वेरिएंट अमेरिका और यूरोप में तेज़ी से फैल रहा है, जिससे भारत में चिंता बढ़ गई है। लक्षण पुराने स्ट्रेन जैसे ही हैं: गले में खराश, खांसी, थकान और सिरदर्द। सतर्कता और अपडेटेड बूस्टर की सलाह दी जाती है।

Web Title : Cicada Variant Resurfaces: Global Spread Sparks Concern for India

Web Summary : The 'Cicada' variant, a subvariant of Omicron, is spreading rapidly in the US and Europe, raising concerns in India. Symptoms resemble previous strains: sore throat, cough, fatigue, and headache. Vigilance and updated boosters are recommended.