शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

CoronaVirus : रशियात कोरोनाचं थैमान; एकाच दिवसात 1189 जणांचा मृत्यू; चीन, युरोपात धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 8:32 PM

जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनुसार युरोपात नवी रुग्ण संख्या सहा टक्के अथवा 30 लाखांनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत 18 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती.

वॉशिंग्टन - जगातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. रशियातील संक्रमितांची आकडेवारी दररोज नवनवे विक्रम करत आहे. ब्रिटन आणि चीनमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोना बाधितांची संख्या 24.74 कोटींच्याही पुढे गेली आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही 50.1 लाखांच्या पुढे गेला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 46,140,509 कोरोना रुग्ण आढळून आले असून 748,173 जणांचा मृत्यू झाला आहे.

रशियाला बसतोय तगडा तडाखा -कोरोनाने रशियाला जोरदार तडाखा दिला आहे. रशियामध्ये गेल्या 24 तासांत 40,443 नवे कोरोनाबाधित समोर आले. यासह एकूण संक्रमितांची संख्या 8,633,643 वर पोहोचली आहे. एवढेच नाही तर रशियामध्ये एका दिवसात 1,189 जणांचा मृत्यू झाला असून, यासह मृतांची संख्या 242,060 वर गेली आहे.

युरोपात सातत्याने वाढतायत रुग्ण - युरोपात सलग पाटव्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनुसार युरोपात नवी रुग्ण संख्या सहा टक्के अथवा 30 लाखांनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत 18 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. इंग्लंडमधील उच्च स्थरीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सरकाराला पुन्हा एकदा मास्कचा वापर आणि डिस्टंसिंगचे नियम लागू करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.

चीनमध्ये 100 नवे रुग्ण -चीनमध्ये बुधवारी 100 हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यांपैकी नऊ रुग्ण बीजिंगमध्ये आढळून आले आहेत. बीजिंगमध्ये यापूर्वीच अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. शहरातून देशाच्या इतर भागांत जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या नेशनल हेल्थ कमीशनच्या अहवालात म्हणण्या आले आहे की, मंगळवारपर्यंत 1,000 रूग्णांवर उपचार सुरू होते. यांपैकी 37 जणांची प्रकृती चिंताजनक होती. चीनच्या 76 टक्के जनतेला कोरोना लस दिली असतानाही, तेथे अशी परिस्थिती आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाEnglandइंग्लंडchinaचीनCorona vaccineकोरोनाची लस