CoronaVirus कोरोनाचे बुमरँग! न्यूयॉर्कहून व्हायरस घुसल्याने चीनचे दुसरे 'वुहान' लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 13:16 IST2020-04-24T13:06:12+5:302020-04-24T13:16:25+5:30
CoronaVirus चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून हेलोनजिआंग प्रांतातील हर्बिन हे एक कोटी लोकसंख्येचे शहर लॉकडाऊन करावे लागले आहे. मात्र, कोरोनाचा उद्रेक झालेले वुहान हे शहर पूर्वपदावर येऊ लागले आहे.

CoronaVirus कोरोनाचे बुमरँग! न्यूयॉर्कहून व्हायरस घुसल्याने चीनचे दुसरे 'वुहान' लॉकडाऊन
बिजिंग : कोरोना व्हायरसचा पहिल्यांदा फैलाव चीनमध्ये झाला होता. आता या व्हायरसने अमेरिकेसह जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केलेली आहे. यामुळे चीनवर मुद्दामहून कोरोना व्हायरस पसरविल्याचे आरोप होत आहेत. तर आता कोरोनामुळे पुन्हा चीनलाच धडकी भरली आहे. कारण न्यूयॉर्कहून आलेल्या प्रवाशांमुळे चीनचे दुसरे शहर लॉकडाऊन करावे लागले आहे.
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून हेलोनजिआंग प्रांतातील हर्बिन हे एक कोटी लोकसंख्येचे शहर लॉकडाऊन करावे लागले आहे. मात्र, कोरोनाचा उद्रेक झालेले वुहान हे शहर पूर्वपदावर येऊ लागले आहे. हर्बिन शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना संदिग्ध नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. खासकरून बाहेरून आलेल्या लोकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. व्हायरसचे संक्रमण वेळीच रोखल्यास कम्यूनिटी ट्रांसमिशनचा धोका टळणार आहे.
हर्बिनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, या शहरामध्ये कोरोना व्हायरस एका २२ वर्षांच्या विद्यार्थिनीमुळे पसरला आहे. ही विद्यार्थिनी न्यूयॉर्कहून परतली होती. १९ मार्चला ती चीनमध्ये आली होती. या काळात ती हाँगकाँग आणि बिजिंगमध्ये थांबली होती. आयसोलेशनवेळी तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, एप्रिलमध्ये तिच्यामध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले. या विद्यार्थिनीमुळे तिच्या एका शेजाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली ज्याला ती या काळात भेटली नव्हती.
हर्बिन ही हेलोनजिआंग प्रांताची राजधानी आहे. या शहरामध्ये लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना सरकारी अॅपद्वारे कोरोना नसल्याची हमी द्यावी लागणार आहे. याद्वारे त्या ठिकाणी तामपान पाहिले जाणार असून मास्कही घालावे लागणाक आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. लग्न, अंत्य संस्कार, बैठका यावर बंदी आणण्यात आली आहे. हे जवळपास १ कोटी लोकसंख्या असलेले शहर आहे.
हर्बिनमध्ये रशियाच्या नागरिकांचे येणे-जाणे मोठ्या संख्येने असते. या प्रांतात आतापर्यंत ५४० कोरोना रुग्ण सापडले असून हर्बिनच्या ५५ रुग्णांपैकी २१ जणांमध्ये कोरोनाचे एकही लक्षण आढळलेले नाही.
आणखी वाचा...
अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात
कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी बळी जाण्याची भीती