सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात वाद? दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 09:37 IST2022-11-06T09:36:51+5:302022-11-06T09:37:28+5:30

भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक या दोघांनी काही वर्षापूर्वी लग्न केले. त्यांच्या लग्नादरम्यान अनेकांनी टीकेसह विरोध केला होता.

Controversy between Sania Mirza and Shoaib Malik Talks of separation between the two | सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात वाद? दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चा

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात वाद? दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चा

भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक या दोघांनी काही वर्षापूर्वी लग्न केले. त्यांच्या लग्नादरम्यान अनेकांनी टीकेसह विरोध केला होता. तरीही या दोन खेळाडूंनी लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे. सध्या सोशल मीडियावर हे दाम्पत्य विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या दोघांत सध्या पटत नाही.त्यामुळे ते वेगळे राहणार असल्याचे बोलले जात आहे. 

South Africa vs Netherlands: मोठा उलटफेर! नेदरलँडकडून द.आफ्रिकेचं 'पॅकअप'; बांगलादेश-पाकिस्तानला नामी संधी

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी २०१० मध्ये वादग्रस्त वातावरणात लग्न केले, दुसऱ्या एका महिलेने शोएबवर तिच्याशी लग्न केल्याचा आरोप केला. या दोघांना एक मुलगाही आहे. नुकताच त्यांनी मुलगा इझानचा वाढदिवस एकत्र साजरा केला, परंतु सानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर पार्टीचे फोटो पोस्ट केले नाहीत. यामुळे आता ते विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

काही आरोप करत आहेत की पाकिस्तानी क्रिकेटरने सानियाची शूटिंग करत असलेल्या शोमध्ये फसवणूक केली. तसेच, सानिया मिर्झा सध्या तिच्या सोशल मीडियावर नाराज असल्याचे काही पोस्ट शेअर करत असते.

मात्र, आतापर्यंत या गोष्टींबाबत अधिकृतपणे काहीही दुजोरा मिळालेला नाही. सानिया आणि शोएबनेही या अफवांवर मौन पाळले आहे. या दोघांनी  या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title: Controversy between Sania Mirza and Shoaib Malik Talks of separation between the two