गर्लफ्रेन्डसोबत ठेवत होता संबंध, चुकून आईला लागला फोन आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 18:34 IST2021-11-11T18:32:26+5:302021-11-11T18:34:02+5:30
गायिका कोलीन नोलनच्या (Coleen Nolan) मुलाने जेव्हा तिला फोन केला तेव्हा अचानक बॅटरी डाऊन झाल्याने फोन स्वीच ऑफ झाला होता. त्यानंतर आलेला कॉल व्हॉइसमेलला कनेक्ट झाला

गर्लफ्रेन्डसोबत ठेवत होता संबंध, चुकून आईला लागला फोन आणि मग....
मोबाइल फोन हा आजच्या जगात सर्वात महत्वाच्या वस्तूंपैकी एक झाला आहे. फोनशिवाय लोक एक क्षणही राहू शकत नाहीत. काही लोक तर सतत २४ तासही फोनवर असतात. अशात फोनमुळे कधी कधी मोठमोठे विचित्र प्रकारही घडतात. अनेकदा लोक अडचणीतही येतात. जसे की, कुणालातरी चुकून फोन लागणे, चुकून मेसेज जाणे, व्हिडीओ पाठवला जाणे. असाच प्रकार एका तरूणासोबत झाला तेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत शरीरसंबंध ठेवत होता.
ब्रिटनमधील लोकप्रिय गायिका, लेखक आणि टीव्ही अॅंकर कोलीन नोलन (Coleen Nolan) ने तिचा टीव्ही शो Loose Women मध्ये खुलासा केला की, त्या घटनेने तिला तिच्या जीवनात सर्वात मोठ्या लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागला होता. कोलीन नोलनने त्या क्षणाला आठवत सांगितलं की, तिचा मुलगा त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत संबंध ठेवत होता तेव्हा त्याचा चुकून मला फोन लागला.
गायिका कोलीन नोलनच्या मुलाने जेव्हा तिला फोन केला तेव्हा अचानक बॅटरी डाऊन झाल्याने फोन स्वीच ऑफ झाला होता. त्यानंतर आलेला कॉल व्हॉइसमेलला कनेक्ट झाला. तिच्या मुलाला याची अजिबात कल्पना नव्हती. साधारण ५ मिनिटे फोन कनेक्ट होता आणि तिकडून येणारे आवाज व्हाईसमेलवर आला.
Daily Star च्या रिपोर्टनुसार, जेव्हा नोलनने फोन स्वीच ऑन केला तेव्हा मुलाचा व्हाईसमेल मिळाला. तिने ऑडीओ क्लिप प्ले केली आणि आवाज ऐकून हैराण झाली. अजब आवाज येत होते. जे ऐकून तिला विचित्र वाटलं. मुलाचा फोन जेव्हा आईच्या फोनला कनेक्ट झाला तेव्हा तो गर्लफ्रेन्डसोबत संबंध ठेवत होता. पण त्याला याची अजिबात कल्पना नव्हती