क्लोज कॉल!...तर पृथ्वीवर येताना चीनचे रॉकेट आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आदळले असते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 04:12 PM2021-05-11T16:12:40+5:302021-05-11T16:13:34+5:30

China's Uncontrol Rocket: चिनी रॉकेटच्या या कृतीमुळे ते अनियंत्रित झाले की मुद्दामहून केले गेले या शंकेला वाव मिळाला आहे. या धोक्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या सहकारी देशांना याची माहिती दिली नाही.

Close call! ... then a Chinese rocket would have hit the International Space Station: American Scientist | क्लोज कॉल!...तर पृथ्वीवर येताना चीनचे रॉकेट आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आदळले असते

क्लोज कॉल!...तर पृथ्वीवर येताना चीनचे रॉकेट आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आदळले असते

googlenewsNext

वॉशिंग्टन : जगभरातील वैज्ञानिकांसाठी चिंतेचा विषय बनलेले चीनचे रॉकेट (China's out of control rocket) दोन दिवसांपूर्वी हिंदी महासागरात (Indian Ocean) पडले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतू या आधी हे अनियंत्रित झालेले रॉकेट अंतराळात भरकटलेले असताना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या (International Space Station) अगदी जवळून गेले. अमेरिकेचे अॅस्ट्रोफिजिक्स सेंटरचे खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडावेल यांनी चीनच्या या रॉकेटवर नजर ठेवली होती. सोमवारी त्यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. (American space agency NASA on Sunday slammed China for failing to meet "responsible standards" regarding its space debris.)


चिनी रॉकेट पृथ्वीच्या दिशेने येत असताना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या अगदी जवळून गेल्याचे ते म्हणाले. जोनाथन यांनी सांगितले की, चीनचे रॉकेट आणि अंतराळ स्टेशन तिआन्हे वेगळे झाल्यानंतर अवघ्या 6 मिनिटांनी दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या जवळ आले होते. ते 300 किमीच्या परिघात आले होते. जे स्पेस स्टेशनच्या परिक्रमेच्या मार्गानुसार खूप धोकादायक होते. चिनी रॉकेटला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या अगदी जवळून जाण्यासाठी फक्त काही वेळाचीच गरज होती. 


चिनी रॉकेटच्या या कृतीमुळे ते अनियंत्रित झाले की मुद्दामहून केले गेले या शंकेला वाव मिळाला आहे. या धोक्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या सहकारी देशांना याची माहिती दिली नाही. कारण आधीच जगभरातील देश हे रॉकेट कुठे कोसळेल याच्या चिंतेमध्ये होते. 8 एप्रिलला सायंकाळी 4 च्या सुमारास (अमेरिकी वेळ) हे रॉकेट मालदीवजवळच्या समुद्रात कोसळले. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने चीनच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमावरून चीनला कठोर शब्दांत फटकारले आहे. 


नासाने (NASA) सांगितले की, चीन जबाबदार मानकांचे पालन करण्यास असफल ठरला आहे. भारतातही काही लोकांनी चीनचे रॉकेट कोसळताना पाहिल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी रॉकेटचे अवशेष मालदीवच्या समुद्रात कोसळल्याचे म्हटले आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी चीनची कडवी निंदा केली आहे. चीन आणि अन्य देश अंतराळात वावरताना जबाबदारीने आणि पारदर्शकतेने वागण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 
 

Web Title: Close call! ... then a Chinese rocket would have hit the International Space Station: American Scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.