पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये चकमक, १९ पाकिस्तानी सैनिक ठार; तालिबानने १५ हजार सैनिक पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:07 IST2024-12-29T10:03:24+5:302024-12-29T10:07:44+5:30

पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात भीषण लढाई सुरू आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर अफगाण आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीषण संघर्ष सुरू असून त्यात १९ पाकिस्तानी सैनिक आणि तीन अफगाण नागरिक ठार झाले आहेत.

Clashes in Pakistan-Afghanistan, 19 Pakistani soldiers killed; Taliban sends 15,000 soldiers | पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये चकमक, १९ पाकिस्तानी सैनिक ठार; तालिबानने १५ हजार सैनिक पाठवले

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये चकमक, १९ पाकिस्तानी सैनिक ठार; तालिबानने १५ हजार सैनिक पाठवले

पाकिस्तानचे सैनिक आणि अफगाणिस्तानच्या सैन्यामध्ये गेल्या काही दिवसापासून तणाव सुरू आहे. पाकिस्तानी लष्करी विमानांनी अफगाणिस्तानच्या पूर्व पक्तिका प्रांतावर बॉम्बफेक केल्यानंतर काबूलने प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर अफगाण आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीषण संघर्ष सुरू असून, त्यात १९ पाकिस्तानी सैनिक आणि तीन अफगाण नागरिक ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात भीषण लढाई सुरू आहे.

दक्षिण कोरियात मोठा अपघात, विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले, २८ ठार

अफगाणिस्तानच्या सैन्याने खोस्त प्रांतातील अली शिर जिल्ह्यात अनेक पाकिस्तानी लष्करी चौक्यांना आग लावली आणि पाक्टिका प्रांतातील दांड-ए-पाटन जिल्ह्यातील दोन पाकिस्तानी चौक्यांवर कब्जा केला, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने म्हटले आहे.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी दिलेली माहिती अशी, पाकिस्तानच्या प्राणघातक हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून त्यांच्या लष्करी दलांनी पाकिस्तानमधील अनेक लक्ष्यांना लक्ष्य केले. पाकने गेल्या मंगळवारी पक्तिका प्रांतातील सात गावांवर हवाई हल्ले केले होते.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी आणि बंडखोरांना ठार करण्यासाठी त्यांनी ही कारवाई केली होती. या हल्ल्यात किमान ४६ लोक मारले गेले, यात महिला आणि लहान मुले आहेत. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी अफगाणिस्तानने १५ हजार सैनिक पाठवले आहेत.

शनिवारी अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विटरवर पोस्ट केली की, त्यांच्या सैन्याने पाकिस्तानी स्थानांना लक्ष्य केले. 

मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खावरजामी यांनी हल्ल्यांबाबत अधिक माहिती दिली नाही. अफगाण सैन्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक घराबाहेर पडले.

दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबूल गेल्या २४ तासांत दोन स्फोटांनी हादरली. शनिवारी सकाळी १० वाजता काबूलमधील शेख झायेद रुग्णालयासमोरील गृह मंत्रालयाच्या कार्यालयाजवळ स्फोट झाल्याचे वृत्त आहे. 

Web Title: Clashes in Pakistan-Afghanistan, 19 Pakistani soldiers killed; Taliban sends 15,000 soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.