पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:18 IST2025-06-11T14:18:17+5:302025-06-11T14:18:45+5:30

बलूचिस्तानात बंडखोर सशस्त्र समुहाविरोधात पाकिस्तानी सैन्याचे अभियान सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या संख्येने जवानांना बलूचिस्तानात उतरवले आहे

Civil war in Pakistan! 23 Pakistani army personnel killed in clash with rebels in Balochistan | पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार

पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्य आणि बलूच बंडखोरांमध्ये मोठी झटापट झाली आहे. वेगवेगळ्या झटापटीत पाकिस्तानी सैन्याचे २३ जवान मारले गेले तर या संघर्षात बलूच लिबरेशन आर्मीचे ९ जवानही ठार झाल्याचे पुढे आले आहे. बलूच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जायंद बलूच यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात गोनी पारानजीक झालेल्या संघर्षात पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरद्वारे कमांडो उतरवायला लागल्याचे सांगण्यात आले.

बलूच बंडखोर आणि पाकिस्तानी सैन्यात गृहयुद्ध

६ जूनच्या रात्री पाकिस्तानी सैन्य मस्तंग परिसरात पुढे सरकत होते तेव्हा बलूच लिबरेशन आर्मीसोबत त्यांची झटापट झाली. सकाळपर्यंत सुरू असलेल्या या संघर्षात पाकिस्तानी सैन्याचे ८ जवान मारले गेले तर अनेकजण जखमी झाले. त्याशिवाय ८ जूनला आणखी एक चकमक झाली त्यातही पाकिस्तानी सैन्याचे जवान मारले गेले. बलूचिस्तानात अनेक भागात हा संघर्ष सुरू असल्याचं बलूच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते म्हणाले. 

पाकिस्तानी सैन्याचं बलूचिस्तानात अभियान

बलूचिस्तानात बंडखोर सशस्त्र समुहाविरोधात पाकिस्तानी सैन्याचे अभियान सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या संख्येने जवानांना बलूचिस्तानात उतरवले आहे तरीही बलूचिस्तानातील बंडखोर भारी पडत आहेत. मागील काही दिवसांपासून बलूचिस्तानच्या अनेक शहरांवर कब्जा करण्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. बलूच बंडखोरांना मिळणाऱ्या यशाने पाकिस्तानी सैन्य खवळलं आहे. त्यातूनच तिथल्या नागरिकांविरोधात सैन्याने क्रूर अभियान सुरू केले. बलूचिस्तानात पुन्हा एकदा लोक अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

बलूचिस्तानात ९ जणांना बळजबरीनं केले गायब

बलूच नागरिक गटाने सांगितले की, बलूचिस्तानात २ वेगवेगळ्या ठिकाणांहून ९ लोकांना बळजबरीने गायब करण्यात आले आहे. पासनीजवळ सुरक्षा जवानांनी २ जणांना ताब्यात घेतले आणि अज्ञात स्थळी नेले असं बलूचिस्तान पोस्टमध्ये रिपोर्ट आला आहे. तसेच सोमवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने केचमध्ये बालनिगोर जिल्ह्यात छापेमारी आणि शोध अभियान सुरू केले आहे. त्यात ७ युवकांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेले.
 

Web Title: Civil war in Pakistan! 23 Pakistani army personnel killed in clash with rebels in Balochistan