शाहबाज सरकारला धक्का; पाकिस्तानात तैनात होणार चीनी सुरक्षा दल, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 20:02 IST2025-03-26T20:02:13+5:302025-03-26T20:02:46+5:30

Chinese Security In Pakistan: चीनने तीन खासगी कंपन्यांना याची जबाबदारी सोपवली आहे.

Chinese Security In Pakistan: A shock to Shahbaz government; Chinese security forces will be deployed in Pakistan, why? | शाहबाज सरकारला धक्का; पाकिस्तानात तैनात होणार चीनी सुरक्षा दल, कारण काय?

शाहबाज सरकारला धक्का; पाकिस्तानात तैनात होणार चीनी सुरक्षा दल, कारण काय?

China Deployed Security : काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ट्रेन हायजॅक करण्यात आली होती. या घटनेमुळे पाकिस्तान-बलुचिस्तानमधील वाद पुन्हा जगासमोर आला. याच पार्श्वभूमीवर चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये चिनी अभियंते आणि मजुरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे चीनने आपल्या प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये खाजगी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. 

चीनने अलीकडेच पाकिस्तानमधील CPEC प्रकल्पात काम करत असलेल्या आपल्या अभियंते आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी करार केला आहे. अलीकडेच बलुचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेसचे अपहरण आणि लष्कराच्या बेसवर झालेल्या हल्ल्यानंतर चीनने हे पाऊल उचलले आहे. 

चीनने संयुक्त सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्या तीन खाजगी कंपन्यांवर सोपवली आहे Dewe Security Frontier Service Group, China Overseas Security Group आणि Huaxin Zhongshan Security Service या तीन कंपन्यांवर सुरक्षेची जबाबदारी असेल. पहिल्या टप्प्यात सिंध प्रांतातील दोन CPEC ऊर्जा प्रकल्पांवर 60 चीनी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. हे सैनिक सुरक्षेत गुंतलेल्या पाकिस्तानी लष्करावर नजर ठेवतील.

चीनचा पाकिस्तानी सुरक्षेवर विश्वास नाही?
CPEC अंतर्गत सुमारे 6,500 चीनी नागरिक सिंध प्रांतातील थार कोळसा ब्लॉकमध्ये दोन ऊर्जा प्रकल्पांवर काम करत आहेत. गुप्तचर अहवालानुसार, चिनी नागरिकांच्या पहिल्या सर्कलमध्ये चिनी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चिनी नागरिकांचा बाहेरील लोकांशी कमीत कमी संपर्क यावा यासाठी असे करण्यात आले आहे. सुरक्षा कर्मचारी कामगारांच्या नियोजित हालचाली सुनिश्चित करतील. ही योजना इतर सुरक्षा मंडळांमध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्करासोबत शेअर केली जाईल.

चीनने यापूर्वी पाकिस्तानवर आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ची एक तुकडी तैनात करण्यासाठी दबाव आणला होता. पाकिस्तानने सुरुवातीला ते मान्य केले नाही, परंतु चीनच्या दबावानंतर संयुक्त सुरक्षा कंपन्यांच्या फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केली. या आराखड्याअंतर्गत चीनचे सुरक्षा दल पाकिस्तानमध्ये तैनात करण्यात आले आहे.

Web Title: Chinese Security In Pakistan: A shock to Shahbaz government; Chinese security forces will be deployed in Pakistan, why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.