भारतीय लष्कराच्या दणक्याने ड्रॅगनचे धाबे दणाणले, राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी मॉस्कोमध्ये चिनी संरक्षण मंत्र्यांची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 07:18 AM2020-09-04T07:18:17+5:302020-09-04T07:18:35+5:30

भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनाती वाढवल्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चीनची कोंडी झाली आहे.

Chinese defense minister rushes in Moscow for Rajnath Singh's visit | भारतीय लष्कराच्या दणक्याने ड्रॅगनचे धाबे दणाणले, राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी मॉस्कोमध्ये चिनी संरक्षण मंत्र्यांची धावाधाव

भारतीय लष्कराच्या दणक्याने ड्रॅगनचे धाबे दणाणले, राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी मॉस्कोमध्ये चिनी संरक्षण मंत्र्यांची धावाधाव

Next

मॉस्को/ नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांनी भारतासोबत चर्चा करण्याची विनंती केली आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारची वेळ मागितली आहे. मात्र भारताकडून त्याला अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नाही.

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून लडाखमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. दरम्यान, २९-३० रोजी पँगाँग सरोवर परिसरात झालेल्या झटापटीवेळी भारतीय लष्कराने चिनी सैन्याला पुन्हा एकदा आपला हिसका दाखवला होता. तसेच सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण भागांवर आपले पाय रोवले होते. त्यामुळे चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली होती. दरम्यान, भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनाती वाढवल्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चीनची कोंडी झाली आहे.



दरम्यान, सध्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे चिनी समकक्ष वेई फेंघे हे शांघाई सहयोग संघटना (एससीओ) च्या बैठकीसाठी मॉस्कोमध्ये आहेत. दरम्यान, चिनी संरक्षण मंत्र्यांनी लडाखमध्ये तणाव वाढलेला असतानाच चर्चेसाठी विनंती केल्याने त्याचं महत्त्व वाढलं आहे.

रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार

चीनला एकदा दोनदा नाही अनेकदा नडणाऱ्या भारतीय सैनिकांना मोठे घातक शस्त्र मिळणार आहे. भारत आणि रशियाने अद्ययावत अङ-47 203 रायफलींची डील फायनल केली आहे. जुन्या मॉडेलपेक्षा ही रायफल हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये, लडाखसारख्या किंवा कारगिलसारख्या उंच ठिकाणी लढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. यामुळे उंचीवर लपलेल्या शत्रूच्या सैनिकांना खालूनच अचूक टिपता येणार आहे. 

चीनसोबतचा तणाव आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सीमाविवाद पाहता ही डील खूप महत्वाची मानली जात आहे. रशियन वृत्तसंस्थांनुसार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर असून हा निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनात घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे पहिली  AK-47  ही रायफल रशियानेच तयार केली होती. आता जगभरात या रायफली बनविल्या जातात. परंतू रशियाकडे सध्या नवीन पिढीची खतरनाक रायफल आहे. ही रायफल भारताकडील इन्सास रायफलींची जागा घेणार आहे. हिमालयाच्या उंच जागांवर ही रायफल जाम होणे किंवा मॅगझिन तुटण्यासारख्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नवीन राफलची भारतीय सैन्याला नितांत गरज आहे. 

Web Title: Chinese defense minister rushes in Moscow for Rajnath Singh's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.