चीनच्या मानवाधिकार कार्यकर्त्याकडून 'ड्रॅगन'ची पोल-खेल, केले अतिशय गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 05:02 PM2020-08-24T17:02:00+5:302020-08-24T17:09:23+5:30

टेंग बियाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सीसीपीने 1949 मध्ये हुकूमशाहीवादी शासनाची स्थापना केली. यानंतर कुओमिन्तांग लोकांना मारायला सुरुवात झाली. तसेच जमीनदारांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली गेली.

chinese communist party an existential threat to humanity says teng biao | चीनच्या मानवाधिकार कार्यकर्त्याकडून 'ड्रॅगन'ची पोल-खेल, केले अतिशय गंभीर आरोप

चीनच्या मानवाधिकार कार्यकर्त्याकडून 'ड्रॅगन'ची पोल-खेल, केले अतिशय गंभीर आरोप

Next
ठळक मुद्दे टेंग बियाओ म्हणाले, सुरुवातीपासूनच सीसीपी एक मानवी आपत्ती ठरली आहे. TikTok, WeChat, आदि अॅप्स गोपनीयतेला धोका - टेंग बियाओपश्चिमेकडील देशांतील चिनी मीडिया वास्तवात सीसीपीसाठी काम करणारे गुप्तहेर आणि प्रचारक - टेंग बियाओ

नवी दिल्ली -चीनमधील मानवाधिकार कार्यकर्ते स्कॉलर टेंग बियाओ यांनी चीनमधील कम्यूनिस्ट पक्षाची आणि जिनपिंग सरकारची पोलखोल केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की 2012मध्ये शी जिनपिंग चीनचे राष्ट्रपती झाल्यानंतर, चीनची परिस्थिती अधिकच खराब झाली आहे. टेंग म्हणाले, शी यांनी विरोधकांवर हल्ला केला आणि किमान 300 वकीलांना ताब्यात घेतले आहे. 2012पासून हे सर्वजण जेलमध्ये आहेत. टेंग हे, "चिनी कम्युनिस्ट पार्टी : अ अॅक्सीटेंसिअल थ्रेट टू ह्यूमॅनिटी अँड द रूल्स बेस्ड वर्ल्ड ऑर्डर" नावाच्या एका वेबिनारमध्ये बोलत होते.

टेंग बियाओ म्हणाले, "चीनमध्ये माझे अपहरण करण्यात आले, मला गायब करण्यात आले आणि माझा प्रचंड छळ करण्यात आला. शी जिनपिंग सरकारने इंटरनेट, विद्यापीठे आणि समाजावर आपले नियंत्रण मजबूत केले आहे. झिंजियांगमध्ये, 21व्या शतकात सर्वात वाईट मानवी आपत्तीचे नेतृत्व करण्यासाठी कमितकमी 20 लाख वुईगर मुसलमान आणि इतर तुर्क मुसलमानांना ताब्यात घेण्यात आले आहे."

सुरुवातीपासूनच सीसीपी एक मानवी आपत्ती ठरली आहे-  
टेंग बियाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सीसीपीने 1949 मध्ये हुकूमशाहीवादी शासनाची स्थापना केली. यानंतर कुओमिन्तांग लोकांना मारायला सुरुवात झाली. तसेच जमीनदारांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली गेली. सुरुवातीपासूनच सीसीपी एक मानवी आपत्ती ठरली आहे. 

तियानमेन चौकात हजारो निदर्शकांचा नरसंहार -
एलए आणि दुष्काळामुळे लाखो चिनी लोक मारले गेले. 1989 मध्ये, त्यांनी तियानमेन चौकात हजारो निदर्शकांचा नरसंहार केला. 1999 मध्ये, लाखो फालून गोंग डॉक्टरांना कारागृहात डांबण्यात आले आणि हजारोंची कत्तल करण्यात आली."

एका चिनी कवीचा किस्सा -
यावेळी त्यांनी एका चिनी कवीचा किस्साही सांगितला. त्यांनी सीसीपीविरोधात केलेल्या काही लिखानामुळे त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. यानंतर त्यांना 1990 मध्ये स्विडिश पासपोर्ट मिळाला. 2015 मध्ये त्यांचे थायलंडमध्ये अपहरणही झाले होते. यानंतर ते बरेच दिवस गायब होते. नंतर त्यांना सोडण्यात आले. यानंतर त्यांना काही यूरोपीयन खासदारांसमक्ष नेण्यात आले आणि पुन्हा गायब करण्यात आले.

पश्चिमेकडील देशांतील चिनी मीडिया वास्तवात सीसीपीसाठी काम करणारे गुप्तहेर आणि प्रचारक -
टेंग यांनी सांगितले, की चीनने जगभरात एक मोठे प्रचार नेटवर्क तयार केले आहे. पश्चिमेकडील देशांतील चिनी मीडिया वास्तवात सीसीपीसाठी काम करणारे गुप्तहेर आणि प्रचारक आहेत. हेरगिरीसाठी मदत म्हणून चीनने अनेक अॅप्सदेखील तयार केले आहेत. TikTok, WeChat, आदि अॅप्स गोपनीयतेला धोका आहेत. ते चीनला प्रचारात मदत करत आहेत. याशिवाय कन्फ्यूशिअस संस्थादेखील अॅकॅडमिक स्वातंत्र्यासाठी एक मोठे संकट बनले आहेत. या वेबिनारचे आयोजन उसाना फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

कपिल सिब्बल, आझाद भडकताच 'हे' दिग्गज नेते राहुल गांधींच्या मदतीला; असे केले ट्विट...

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

Web Title: chinese communist party an existential threat to humanity says teng biao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.