चीनचा अजब फतवा! आता कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या होणार महाग; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 16:55 IST2026-01-18T16:54:33+5:302026-01-18T16:55:04+5:30

चीनमधील जन्मदर कमालीचा घटल्याने ड्रॅगनची चिंता वाढली असून, आता कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीवर १३ टक्के इतका भारी कर आकारण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे.

China's strange fatwa! Now condoms and contraceptive pills will be expensive; What is the real reason? | चीनचा अजब फतवा! आता कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या होणार महाग; नेमकं कारण काय?

चीनचा अजब फतवा! आता कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या होणार महाग; नेमकं कारण काय?

एकेकाळी वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कठोर 'वन चाईल्ड पॉलिसी' राबवणाऱ्या चीनवर आता चक्क लोकसंख्या वाढवण्याची वेळ आली आहे. चीनमधील जन्मदर कमालीचा घटल्याने ड्रॅगनची चिंता वाढली असून, आता कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीवर १३ टक्के इतका भारी कर आकारण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून हा नवा नियम संपूर्ण चीनमध्ये लागू करण्यात आला आहे.

काय आहे चीनचा नवा प्लॅन? 

चीनमध्ये सध्या तरुणांची संख्या घटून वृद्धांची संख्या वाढू लागली आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि लष्करी शक्तीवर होऊ शकतो, अशी भीती चीनला वाटत आहे. म्हणूनच, प्रत्येक महिलेने किमान दोन मुलांना जन्म द्यावा, असे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. देशाचा प्रजनन दर २.१ पर्यंत नेण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे. गर्भनिरोधक साधने महाग करून लोकांना मुलं जन्माला घालण्यासाठी प्रवृत्त करण्याचा हा एक प्रकारचा दबाव असल्याचे बोलले जात आहे.

खर्चाचे गणित काय सांगते? 

एका रिपोर्टनुसार, चीनमध्ये कंडोमच्या एका पाकीटाची किंमत साधारण ५० युआन (जवळपास ६०० रुपये) आहे, तर महिनाभराच्या गर्भनिरोधक गोळ्यांची किंमत १३० युआन (जवळपास १५०० रुपये) आहे. यावर १३ टक्के टॅक्स लावल्याने किमतीत थोडी वाढ होईल. मात्र, तज्ज्ञांच्या मते, हा टॅक्स वाढवूनही चिनी नागरिकांच्या खिशावर फार मोठा परिणाम होणार नाही. कारण, चीनमध्ये एका मुलाला १८ वर्षांपर्यंत वाढवण्याचा खर्च साधारण ५ लाख ३८ हजार युआन (सुमारे ६५ लाख रुपये) इतका अफाट आहे. त्या तुलनेत टॅक्सची रक्कम ही नगण्य आहे.

फक्त टॅक्स नाही, तर मदतीचा हातही! 

केवळ टॅक्स लावून लोकसंख्या वाढणार नाही, हे ओळखून चीन सरकारने 'नॅशनल चाईल्ड केअर' कार्यक्रमासाठी तब्बल ९० अब्ज युआनचे (सुमारे १२.७ अब्ज डॉलर्स) बजेट जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत ३ वर्षांखालील मुलांच्या पालकांना दरमहा सुमारे ३६०० युआन (४२ हजार रुपये) आर्थिक मदत दिली जाणार आहे.

इतर देशांचा अनुभव काय? 

लोकसंख्या वाढवण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग करणारा चीन हा काही पहिला देश नाही. यापूर्वी सिंगापूर आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनीही जन्मदर वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, सवलती दिल्या. मात्र, आधुनिक जीवनशैली आणि वाढत्या खर्चामुळे या प्रयत्नांना तिथे फारसे यश आलेले नाही. आता चीनचा हा 'टॅक्स' वाला फॉर्म्युला यशस्वी होतो की नाही, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : चीन का जनसंख्या नियंत्रण पर यू-टर्न: कंडोम, गर्भनिरोधक दवाएँ महंगी!

Web Summary : जन्म दर में गिरावट से चिंतित चीन ने कंडोम और गर्भनिरोधक गोलियों पर कर लगाया। सरकार का लक्ष्य जनसंख्या बढ़ाना है। बच्चों वाले परिवारों को आर्थिक सहायता मिलेगी। सिंगापुर जैसे देशों ने भी पहले ऐसे प्रयास किए हैं।

Web Title : China's population push: Condoms and birth control pills to get pricier.

Web Summary : Facing a declining birth rate, China imposes a tax on condoms and birth control pills, effective January 2026. Aiming to boost the population, the government encourages families to have more children and offers financial aid to parents with young children, mirroring efforts by countries like Singapore.

टॅग्स :chinaTaxचीनकर