२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:00 IST2025-09-04T14:59:39+5:302025-09-04T15:00:20+5:30
China's LY-1 Ship Based Laser Air Defense System: गेल्या काही वर्षांमध्ये जगातील विविध भागात निर्माण झालेले संघर्ष आणि शस्त्रास्त्र स्पर्धेदरम्यान, चीनने एक अत्यंत घातक हत्यार जगासमोर आणलं आहे. या शस्त्राची मारक क्षमता थोडी थोडकी नाही तर तब्बल २० हजार किमी एवढी प्रचंड आहे.

२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
गेल्या काही वर्षांमध्ये जगातील विविध भागात निर्माण झालेले संघर्ष आणि शस्त्रास्त्र स्पर्धेदरम्यान, चीनने एक अत्यंत घातक हत्यार जगासमोर आणलं आहे. या शस्त्राची मारक क्षमता थोडी थोडकी नाही तर तब्बल २० हजार किमी एवढी प्रचंड आहे. त्यामुळे जवळपास संपूर्ण जगच चीनच्या टप्प्यात आलं आहे. तसेच चीन या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून जगातील कुठल्याही भागात हल्ला करण्यास सक्षम झाला आहे.
बुधवारी चीनची राजधानी बीजिंग येथे झालेल्या विजय दिवस परेडमध्ये चीनने आपल्या शस्त्र सामर्थ्याचं प्रदर्शन केलं. पीएलएने आयोजित केलेल्या या परेडमध्ये एलवाय-१ लेझर या हत्याराचाही समावेश करण्यात आला होता. आठ चाकं असलेल्या एचझेड-१५५ या चिलखती ट्रकावर हे लेझर हत्यार लावण्यात आलं असून, ते शत्रूची हत्यारं आणि उपकरणांच्या ऑप्टिकल सेंसर्सना प्रभावीपणे नेस्तनाबूत करू शकतं. चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी सांगितलं की, हे लेझर हत्यार समुद्रातील युद्धामध्ये आश्चर्यकारकरीत्या बदल घडवू शकतं.
एलवाय-१ लेझरबाबत चीनमधील सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने लिहिले की, हे एक डायरेक्टेड एनर्जी हत्यार आहे. ते नौदलाच्या लेझर प्रणालीला मुख्यत्वेकरून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे, त्याचा समुद्रासोबतच जमिनीवरही वापर केला जाऊ शकतो.
हे हत्यार शत्रूच्या ऑप्टिकल सेंसर्सना निष्क्रिय करू शकतं. तसेच कमी खर्चामध्ये अचूक हल्ला करण्याध्ये ते सक्षम आहे. चीनने याची वैशिष्ट्ये गुप्त ठेवली आहेत. मात्र ही उच्च क्षमता असलेल्या या लेझर बीममधून हायपरसॉनिक क्षेपणास्त्रेही रोखणं शक्य आहे.