एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 05:28 IST2025-09-23T05:28:11+5:302025-09-23T05:28:27+5:30

के-व्हिसा जास्त वैधतेसाठी आणि दीर्घकाळ मुक्कामाची मुभा देणारा. शैक्षणिक, सांस्कृतिक, तांत्रिक अशा विविध क्षेत्रांत सहभागाची संधी

China's K-Visa now rivals H-1B visa; China opens its doors to skilled workers | एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार

एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार

बीजिंग - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसासाठी प्रत्येकी ८८ लाख रुपयांचे भरमसाठ शुल्क लागू केल्यावर चीनने यावर कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला. मात्र दुसरीकडे, जगभरातील व्यावसायिकांना आपल्या देशात काम करण्यास चीनने आमंत्रित केले आहे. चीन १ ऑक्टोबरपासून ‘के.-व्हिसा’ ही नवीन योजना सुरू करत आहे. एच-१बी व्हिसाला टक्कर देण्यासाठी चीनचे हे पाऊल असल्याची चर्चा आहे. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन म्हणाले की, कुशल कर्मचाऱ्यांनी  चीनमध्ये स्थायिक व्हावे, प्रगतीसाठी योगदान द्यावे व स्वतःच्या कारकिर्दीतही यश मिळवावे.

तंत्रज्ञांसाठी आकर्षण 
जगभरातील पात्र कर्मचारी, व्यावसायिकांना चीनमध्ये नोकरी व संधी शोधता येईल. या व्हिसाला चीनच्या स्टेट कौन्सिलने मान्यता दिली असून, पंतप्रधान ली कियांग यांनी त्याच्याशी संबंधित कायद्यावर स्वाक्षरी केली आहे.

एच-१बीवर मौन का?
अमेरिकेबरोबर चीनच्या व्यापारी वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे एच-१बी मुद्द्यावर चीनने मौन धारण केले आहे. अमेरिकेशी चर्चेत विद्यार्थी, कर्मचारी व्हिसा या मुद्द्यांवरही चीनने भर दिला.

Web Title: China's K-Visa now rivals H-1B visa; China opens its doors to skilled workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.