शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण चिनी समुद्रात चीनचं शक्तिप्रदर्शन, पाण्यात उतरवली विमानवाहू युद्धनौका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 20:56 IST

दक्षिण चिनी समुद्रात स्वतः दबदबा कायम ठेवण्यासाठी चीननं स्वतःजवळ असलेली शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवली आहे.

बीजिंग- दक्षिण चिनी समुद्रात स्वतः दबदबा कायम ठेवण्यासाठी चीननं स्वतःजवळ असलेली शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवली आहे. इतर डझनांहून अधिक युद्धनौकांबरोबरच ही विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एवढी शक्तिशाली विमानवाहून युद्धनौका समुद्रात उतरवून चीननं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे.सॅटेलाइटवरील छायाचित्रांवरून ही विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवल्याचं उघड झालं आहे. परंतु ही युद्धनौका युद्धसरावासाठी समुद्रात उतरवल्याचं चीनकडून स्पष्टीकरण दिलं गेलं आहे. दक्षिण चीन समुद्रातील हेनन प्रांतात ही विमानवाहू युद्धनौका इतर 40 युद्धनौकांमध्ये उभी असलेलं पाहायला मिळत आहे. चीननं लियाओनिंग या त्यांच्या समुद्री भागात ही युद्धनौका तैनात केल्याचंही सेटलाइटच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रांत दिसत आहे.या युद्धसरावात चीनकडून 6 पाणबुड्या आणि दोन 2 जे-15 लढाऊ विमानंही सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं स्टेटस सिम्बॉलसाठीही ही विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवल्याचं सिंगापूरचे सैन्य विश्लेषक जेम्स चाड यांचं म्हणणं आहेत. दक्षिण चिनी समुद्राच्या दाव्यावरून चीनचा अनेकदा शेजारील राष्ट्रांशी वाद उद्भवला आहे. दक्षिण चीन सागरासंबंधी आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय मान्य करायला चीन तयार नसून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन आजही आपला हक्क सांगत आहे. या समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे चीनला या भागात जास्त रस आहे. इथे चीनने अनेक कृत्रिम बेटे उभारली आहेत. त्यामुळे व्हिएतनामच्या राष्ट्रीय हिताला धोका निर्माण झाला आहे. चीन एक प्रकारे  पश्चिम पॅसिफिक सागरातील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. त्यामुळे अमेरिकेने या भागातील सक्रियता वाढवली आहे. अमेरिकेच्या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट ही या दोन देशातील वैरत्वाची भावना संपुष्टात आल्याचे लक्षण आहे. चीनचा धोका ओळखून दोन्ही देशांनी संरक्षण संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे. 

टॅग्स :south china seaदक्षिण चिनी समुद्रchinaचीन