शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंततर चीनमध्ये मिळाला नवा व्हायरस, Zoonotic Langya चे 35 रुग्ण: जाणून घ्या, माणसांसाठी किती घातक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 17:09 IST

Zoonotic Langya : चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतात Zoonotic Langya विषाणूचा संसर्ग झालेले ३५ रुग्ण सापडले आहेत. इतकंच नाही तर काही जनावरांनाही याचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आलीये.

Zoonotic Langya In China : एकीकजे कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नाहीये, तर दुसरीकडे चीनमध्येच पुन्हा एका नव्या विषाणूनं डोकं बाहेर काढलं आहे. तैवानच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनुसार चीनमध्ये आता Zoonotic Langya हा विषाणू सापडला असून ३५ जणांना त्याचा संसर्गही झाला आहे. तैवान या विषाणूची ओळख पटवण्यासाठी आणि संसर्गाची माहिती मिळवण्यासाठी मॉनिटर करायला न्युक्लिस अॅसिड टेस्टिंग मेथड सुरू करणार असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

Zoonotic Langya हा विषाणू चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतात सापडला आहे. ताईपे टाईम्सनुसार हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये पसरत असल्याचं सांगण्यात आलंय. “अभ्यासातून असं दिसून आलंय की विषाणूचा एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत प्रसार होत नाही. परंतु तो पसरू शकणार नाही असं ठामपणे सांगता येणार नाही. या विषाणूबाबात अधिक माहिती येईपर्यंत सतर्क राहायला हवं,” असं तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी रविवारी सांगितलं.

सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती देताना चुआंग झेन-हसियांग यांनी २ टक्के बकऱ्यांमध्ये आणि ५ टक्के श्वानांमध्ये हा विषाणू सापडल्याचं म्हटलं. तसंच हा विषाणू पसरवण्यासाठी २५ जंगली जनावरांच्या चाचण्या करून चुचुंद्री याला कारणीभूत असल्याचं म्हटलं.

काय आहेत लक्षणं?तपासात या विषाणूची लागण झालेले ३५ रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. तर यापैकी कोणीही एकमेकांच्या संपर्कात आलं नव्हतं. शिवाय त्यांच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला संसर्गही झाला नाही, अशीही माहिती समोर आली आहे. ३५ रुग्णांपैकी २६ रुग्णांना ताप, थकवा, खोकला, भूक न लागणं, अंगदुखी, डोकेदुखी आणि उलटीसारखी लक्षणं दिसून आली. काही लोकांमध्ये प्लेटलेट्स कमी होणं, लिव्हर फेल्युअर आणि किडनी फेल्युअरसारखी लक्षणंही दिसून आली.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या