शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:12 IST

चीन लवकरच नवीन ड्रोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा ड्रोन डासापेक्षाही लहान असणार आहे.

चीन काही दिवसातच नवीन ड्रोन लाँच करणार आहे. डासांच्या आकाराचा नवीन ड्रोन लाँच केला आहे. चीन आता अत्याधुनिक शस्त्रांची निर्मिती करत आहे. याबाबत चीनच्या सरकारी माध्यमांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शास्त्रज्ञ डासांसारखा दिसणारा रोबोट हातात धरलेले दिसत आहेत. हे ड्रोन अनेक प्रकारच्या लष्करी आणि इतर मोहिमांसाठी योग्य असतील. अशा ड्रोनचा वापर लोकांचे खासगी संभाषण ऐकण्यासाठी, लोकांचा मागोवा घेण्यासाठी किंवा पासवर्ड चोरण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावा तज्ञांनी केला आहे.

'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख

संरक्षण तज्ञ टिमोथी हीथ यांनी इशारा दिला आहे. अशा उपकरणांचा वापर पासवर्डसारखी वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी केला जाऊ शकतो. यामध्ये ड्रोनने धोकादायक गोष्टींची वाहतूक केली जाऊ शकते, असा इशारा गुगलसोबत काम करणाऱ्या ट्रेसी फॅलोज यांनी दिला आहे. या ड्रोनद्वारे प्राणघातक विषाणू देखील पाठवले जाऊ शकतात.

हा ड्रोन अधिक धोकादायक असू शकतो. या ड्रोनला ओळखणे कठीण असणार आहे. कारण सामान्य डासांसारखाच हा ड्रोन दिसणार आहे. यामुळे या ड्रोनचा माग काढणे कठीण होणार आहे. 

दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?

इराण-इस्त्रायल यांच्यात एकीकडे तणाव वाढलेला पाहता भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष कमी करण्याच्या दिशेने दोन्ही देशांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी बीजिंगमध्ये भेट घेत चर्चा केली. सोमवारी झालेल्या या बैठकीत सीमावर्ती भागात शांतता, स्थिरता त्याशिवाय दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. डोवाल आणि वांग यांनी भारत-चीन यांच्या संबंधांवर चर्चा केली. दोन्ही देशाच्या हिताचे आणि विकासाला चालना देण्याच्या मुद्द्यावर चर्चेत भर दिला गेला. 

परराष्ट्र मंत्रालयाकडून दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शांतता राखण्यासाठी दहशतवाद्यांचा ठोस सामना करण्याबाबत चर्चा केली. भारताने दहशतवादाचा मुद्दा अशावेळी उचलला आहे जेव्हा मागील काही महिन्यापासून भारत-पाकिस्तान संघर्षात चीनकडून पाकिस्तानला समर्थन मिळत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर हाती घेत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. भारताच्या या कारवाईनंतर ४ दिवस पाकिस्तानसोबत संघर्ष सुरू होता. या संघर्षात १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करण्यावर सहमती झाली. परंतु भारत-पाकिस्तान संघर्षात चीनकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले होते.

टॅग्स :chinaचीन