शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

China Coronavirus : जगभरात ६७ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग; तब्बल १६०० बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 9:09 AM

चीनमधील कोरोना या विषाणूचा संसर्ग जगभरातील ६७ हजारपेक्षा अधिक लोकांना झाला आहे. त्यामध्ये भारतातील तीन रुग्णांचाही समावेश आहे

ठळक मुद्देचीनमधील कोरोना या विषाणूचा संसर्ग जगभरातील ६७ हजारपेक्षा अधिक लोकांना झाला आहे.चीनमधील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या आता १६०० वर पोहोचली आहे. २६४१ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

बीजिंग - चीनमधीलकोरोना या विषाणूचा संसर्ग जगभरातील ६७ हजारपेक्षा अधिक लोकांना झाला आहे. त्यामध्ये भारतातील तीन रुग्णांचाही समावेश आहे. चीनमधीलकोरोनाग्रस्त मृतांची संख्या आता १६०० वर पोहोचली आहे. चीनमधील शुक्रवारी आणखी १४३ कोरोनाग्रस्त रुग्ण मरण पावल्यामुळे आतापर्यंत बळींची संख्या १६०० झाली आहे. 

२६४१ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये करोना संसर्गावरील उपचारांनंतर संपूर्ण बरे झालेल्या ८०९६ रुग्णांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने पीडित एका ८० वर्षीय चीनी पर्यटक वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या विषाणुमुळे होणारा आशियाबाहेरचा हा पहिला मृत्यू आहे.

विविध देशांमध्ये कोरोना विषाणूची रुग्णांची संख्या. चीन - ६६,४९२ जणांना लागण, हाँगकाँग - ५६ जणांना लागण (एकाचा मृत्यू), मकाव - १० रुग्ण, जपान - २६२ रुग्ण (त्यात योकोहामा येथे नांगरलेल्या क्रूझवरील २१८ जणांचा समावेश), सिंगापूर - ६७ रुग्ण, थायलंड - ३४ रुग्ण, दक्षिण कोरिया - २८ रुग्ण, मलेशिया - २१ रुग्ण, तैवान - १८ रुग्ण, व्हिएतनाम - १६ रुग्ण, जर्मनी - १६ रुग्ण, अमेरिका - १५ रुग्ण (एक अमेरिकी नागरिक चीनमध्ये मरण पावला), ऑस्ट्रेलिया - १४ रुग्ण, फ्रान्स - ११ रुग्ण, ब्रिटन - ९ रुग्ण, संयुक्त अरब अमिरतीज - ८ रुग्ण, कॅनडा - ८ रुग्ण, फिलिपिन्स - ३ रुग्ण (त्यातील एकाचा मृत्यू), भारत, इटली प्रत्येकी ३ रुग्ण, रशिया, स्पेन प्रत्येकी २ रुग्ण, बेल्जियम, श्रीलंका, नेपाळ, स्वीडन, कंबोडिया, फिनलंड, इजिप्त प्रत्येकी

क्रूझवरील भारतीयांच्या प्रकृतीत सुधारणा

जपानमधील क्रूझवरील कोरोनाग्रस्तांपैकी तीन भारतीयांची प्रकृती उपचारांनंतर सुधारली आहे. तेथील भारतीयांमध्ये एकही नवा रुग्ण नाही असे जपानमधील भारतीय राजदूतावासाने म्हटले आहे. या क्रूझवर सुरक्षा अधिकारी सोनाली ठक्करला संसर्ग झाला नसल्याचे आढळून आले आहे. सोनालीसह ज्या भारतीयांना कोरोनाची लागण झालेली नाही त्यांना या क्रूझवरून हलवावे अशी मागणी सोनालीचे वडील दिनेश ठक्कर यांनी सरकारकडे केली आहे. डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील ३७११ लोकांपैकी १३८ जण भारतीय आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार

'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'

राज्यात लवकरच शेतीसाठी पाणी महागणार, उद्योजकांनाही फटका

दूरसंचार कंपन्यांमुळे बँकांपुढेही संकट

भाजपला युपी, बिहारमधील सत्ता गमवावी लागेल- आझमी

 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनDeathमृत्यूIndiaभारतdoctorडॉक्टर