शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

चिनी राष्ट्राध्यक्षांसोबतचा पंगा पडला महाग; अलीबाबा गृपचे सर्वेसर्वा जॅक मांना बसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 15:09 IST

हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र, आता यासंदर्भात ते चौथ्या क्रमांकावर आले आहेत. (chinas richest man)

ठळक मुद्देअलीबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांच्या डोक्यावरील चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा 'ताज' आता उतरला आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. जॅक मा यांनी 24 ऑक्टोबर 2020 रोजी सार्वजनिक व्यासपीठावरून चीनच्या रेग्युलेटरी सिस्टमवर कथित भेदभावाचा आरोप केला होता.

बिजिंग - अलीबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांच्या डोक्यावरील चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा 'ताज' आता उतरला आहे. चिनी रेग्युलेटर्सच्या कारवाईनंतर जॅक मा यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झीली आहे. तर त्यांच्या स्पर्धकांची संपत्ती वाढली आहे. (China Under government scrutiny Jack Ma not chinas richest man anymore)

हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र, आता यासंदर्भात ते चौथ्या क्रमांकावर आले आहेत. आता जॅक मा यांच्यावर बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपनीचे मालक झोंग शानशान, टेनसेंट होल्डिंगचे पोनी मा, ई-कॉमर्स कंपनी अपस्टार्ट कोलिन हुआंग हे आहेत.

चीनला जबर झटका देण्याच्या तयारीत अमेरिका; संसदेत विधेयक सादर, करण्यात आली मोठी मागणी

रेग्युलेटर्सवरील टीकेनंतर जॅक मा यांच्या कंपन्यांवर कारवाई -
हुरून लिस्टनुसार, चीनच्या रेग्युलेटर्सकडून अलीबाबा आणि अँट ग्रुपविरोधात केलेल्या कारवाईनंतर जॅक मा यांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाली आहे. जॅक मा यांनी 24 ऑक्टोबर 2020 रोजी सार्वजनिक व्यासपीठावरून चीनच्या रेग्युलेटरी सिस्टमवर कथित भेदभावाचा आरोप केला होता. यानंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. यावेळी त्यांनी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर अँट ग्रुपचा 37 अब्ज डॉलर्सचा आयपीओ टळला होता.

शी जिनपिंग यांच्याकडे बोट -
वॉल स्‍ट्रिट जनरलच्या वृत्तानुसार, जॅक मा यांच्या अँट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचा आदेश थेट चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडूनच आला होता. यानंतर क्रिसमसच्या पूर्व संध्‍येला, जोवर आपल्या अलिबाबा गृप विरोधातील चौकशी पूर्ण होत नही, तोवर देशाबाहेर जाऊ नये, असा आदेशही जॅकमा यांना देण्यात आला होता. या कारवाईनंतर जॅक मा फार कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसून आले. एवढेच नाही, तर चीन सरकारने त्यांना गायब केल्याचेही वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. चीनमध्ये रेग्युलेटरी नियमांवर टीका करणाऱ्या उद्योजकांना सातत्याने निशाणा केले जात आहे.

अमेरिकेनं भारताकडून घेतलंय 216 अब्ज डॉलरच कर्ज, प्रत्येक नागरिकाच्या डोक्याव लाखोंच ऋण

 

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगJack Maजॅक माbusinessव्यवसाय