शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आता 'या' गरीब देशावर चीनचा डोळा, 'पामीर'च्या पहाडांवरच केला दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 12:01 IST

चिनी इतिहासकाराने म्हटले आहे, की चिनी राज्‍याच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम आपल्याला आपण गमावलेली भूमी परत मिळवावी लागेल. काही भूभाग अपण परत मिळवला आहे. तर काही अद्यापही शेजारील देशांच्या ताब्यात आहे.

ठळक मुद्देआता मध्‍य-आशियातही घुसण्याची तयारी करतोय चीन.चीनच्या अधिकृत माध्यमाने आता तजाकिस्‍तानच्या 'पामीर' पहाडांवरच दावा सांगायला सुरुवात केली आहे. चीनच्या सरकारी माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या या लेखामुळे तजाकिस्‍तानमधील अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

पेइचिंग -लडाख आणि दक्षिण चीन समुद्रातील शेजारील देशांच्या भूभागावर कब्‍जा करण्याच्या तयारीत असलेला चीन, आता मध्‍य-आशियातही घुसण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या अधिकृत माध्यमाने आता तजाकिस्‍तानच्या 'पामीर' पहाडांवरच दावा सांगायला सुरुवात केली आहे. यामुळे मध्य-आशियातील या अत्यंत गरीब देशाची चिंता वाढली आहे. चीन आणि तजाकिस्‍तानने 2010 मध्ये एका करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत त्यांना पामीर भागाचा 1 हजार 158 किलो मीटर एवढा प्रचंड भू-भाग नाईलाजास्तव चीनला द्यावा लागला होता.

चिनी इतिहासकार चो याओ लू यांनी चीनमधील काही माहितीच्या आधारे दावा केला आहे, की पामीरचा संपूर्ण भाग त्यांचाच आहे आणि चीनने तो परत मिळवायला हवा. चीनच्या सरकारी माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या या लेखामुळे तजाकिस्‍तानमधील अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. चीनच्या या दाव्यानंतर आता रशियाचेही लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे. कारण, रशिया मध्‍य-आशियातील देशांना रणनीतीच्या दृष्टीने आपला भाग मानतो.

एकट्या तजाकिस्‍तानातच सोन्याचे 145 भांडार -चीन तजाकिस्‍तान आणि अफगानिस्‍तानच्या सीमेवर ताशकुर्गानजवळ एक एअरपोर्ट तयार करत आहे. यामुळे दुशांबेची चिंता अधिक वाढली आहे. चिनी इतिहासकाराने म्हटले आहे, की चिनी राज्‍याच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम आपल्याला आपण गमावलेली भूमी परत मिळवावी लागेल. काही भूभाग अपण परत मिळवला आहे. तर काही अद्यापही शेजारील देशांच्या ताब्यात आहे. यांपैकी पामीरही एक प्राचीन भाग आहे. जो 128 वर्षांपासून जागाच्या दबावामुळे आपल्यापासून वेगळा आहे.

याशिवाय चीन सरकार सोन्याच्या भांडारांसंदर्भातही तजाकिस्‍तान सरकारसोबत चर्चा करत आहे. चिनी वृत्तांनुसार, तजाकिस्‍तानातच जवळपास 145 सोन्याचे भांडार आहेत. तजाकिस्‍तान सरकारने चिनी कंपन्यांना या खानींना विकस‍ित करन्याचा आणि खोदकाम करण्याचाही अधिकार दिला आहे. जे अधिकारी आता या तणावावर लक्ष देऊन आहेत. ते म्हणतात, चीनची ही जुनीच खेळी आहे, ते रस्ते आणि एअरपोर्टच्या माध्यमाने तजाकिस्‍तानच्या बाजूला अधिक जमिनीवर दावा करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या -

झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे

Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

टॅग्स :chinaचीनborder disputeसीमा वादladakhलडाखrussiaरशिया