शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

चीनचं नीच कृत्य : दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर करतोय शस्त्र पुरवठा, 'या' शेजारी देशानं मागितली जगाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 17:57 IST

एका छाप्यात बंदी असलेल्या टांग नॅशनल लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. यात सरफेस टू एअर मिसाइल्सदेखील होते. सांगण्यात येते की या शस्त्रांची किंमत 70,000 ते 90,000 अमेरिकन डॉलर एवढी होती. हे शस्त्र मेड इन चायना होते.

रंगून - भारत आणि जपानला युद्धाची धमकी देणाऱ्या चीनविरोधात आता म्यानमारनेही आपली भडास काढली आहे. म्यानमारच्या लष्कर प्रमुखांनी चीनला इशारा देत म्हणटले आहे, की चीनने येथील दहशतवादी गटांना शस्त्र पुरवठा करू नये. यासंदर्भात लष्कर प्रकमुखांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही सहकार्याची मागणी केली आहे.दक्षिण पूर्व आशियात, म्यानमार हा चीनचा सर्वात जवळील शेजारी असल्याचे मानले जाते.

म्यानमारच्या लष्कर प्रमुखांचा चीनवर निशाणा -रशियातील सरकारी वाहिनी Zvezdaला दिलेल्या मुलाखतीत म्यानमार लष्कर प्रमुख जनरल मिन आंग ह्लाइंग यांनी म्हटले आहे, की त्यांच्या देशातील सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांमागे मोठ्या शक्तीचा हात आहे. म्हणून त्यांनी आता आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी केली आहे. लष्कर प्रमुखांच्या, मोठ्या शक्ती म्हणण्याला चीनशी जोडून बघितले जात आहे.

चीन अराकान आर्मीला पुरवतो शस्त्रास्त्र -म्यानमारचे सैन्य प्रवक्ता ब्रिगेडिअर जनरल जॉ मिन टुन यांनी यावेळी, म्यानमारच्या शस्त्र दलाच्या कमांडर-इन-चीफ यांनी केलेल्या वक्तव्यावर सविस्तर चर्चा केली. प्रवक्त्याने म्हटले आहे, सेना प्रमुखांनी अराकान आर्मी (एए) आणि अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीचा (एआरएसए) उल्लेख केला. या दोन्हीही संघटना चीनला लागून असलेल्या रखाईन प्रांतात सक्रिय आहेत. 

दहशतवाद्यांना शस्त्र पुरवण्यामागे हे कारण -म्यानमारने आपल्या बेल्ट अँड रोड प्रोजक्टला मंजुरी द्यावी, अशी चीनची इच्छा आहे. यामुळे म्यानमार सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी चीन दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करत आहे. मात्र, म्यानमार चीनच्या या प्रोजेक्टला मंजुरी देण्यास तयार नाही. चीन भारताविरोधातील दहशतवादी गटांनाही कश्मीरात हल्ला करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. 

छापेमारीत दहशतवाद्यांकडे आढळून आले सरफेस टू एअर मिसाइल -जनरल मिन आंग ह्लाइंग यांनी म्हटले आहे, की अराकान आर्मीच्या पाठीशी मोठ्या देशाचा हात आहे. 2019 पासून या दहशतवादी संघटना चिनी शस्त्रांनी आणि लँड माइनच्या सहाय्याने म्यानमारच्या सैनिकांवर हल्ला करत आहेत. नोव्हेंबर 2019मध्ये म्यानमारच्या सैनिकांनी टाकलेल्या एका छाप्यात बंदी असलेल्या टांग नॅशनल लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला होता. यात सरफेस टू एअर मिसाइल्सदेखील होते. सांगण्यात येते की या शस्त्रांची किंमत 70,000 ते 90,000 अमेरिकन डॉलर एवढी होती. हे शस्त्र मेड इन चायना होते.

महत्त्वाच्या बातम्या -

भारतानंतर आता 'हा' देशही आक्रमक, चीनविरोधात मोर्चेबांधनीला केली सुरुवात

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

टॅग्स :TerrorismदहशतवादchinaचीनMyanmarम्यानमारterroristदहशतवादी