शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

India China Faceoff : भारताला लुबाडण्यासाठी चीनची 'नवी चाल'; 'या' आवश्यक वस्तूंचे वाढणार भाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 16:15 IST

India China Faceoff : भारत चीनवर अनेक बाबींसाठी अवलंबून आहे. त्यामुळे आता चीनकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे.

नवी दिल्ली - भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. याच दरम्यान आता चीनने भारताला लुबाडण्यासाठी एक नवी चाल केली आहे. आवश्यक वस्तूंचे भाव वाढवण्यात येणार आहे. 

भारताचे फार्मा क्षेत्र पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. भारतीय औषध कंपन्या त्यांच्या गरजेच्या 70 टक्के API चीनकडून आयात करतात. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर चीनने या उत्पादनांच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारत चीनवर अनेक बाबींसाठी अवलंबून आहे. त्यामुळे आता चीनकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. भारत दरवर्षी सुमारे 39 अब्ज डॉलर्स किमतीचे औषध तयार करतो. औषध तयार करण्यासाठी आवश्यक स्टार्टिंग मटेरियल, API साठी भारत मुख्यत्वे चीनवर अवलंबून आहे. 

भारताने आर्थिक वर्ष 2019 मध्ये चीनकडून सुमारे 17,400 कोटी (2.5 अब्ज डॉलर्स) API आयात केले होते. भारत जगातील तिसरा मोठा औषध उत्पादक देश आहे. डॉक्टर रेड्डी लॅब, ल्युपिन, ग्लेनमार्क फार्ममा, मायलन, झाइडस कॅडिला आणि पीफायझर सारख्या भारतातील आघाडीच्या औषध कंपन्या API साठी मुख्यतः चीनवर अवलंबून आहेत. वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष दिनेश दुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यातील घटनेसंदर्भात चीन दोन प्रकारे हल्ला करत आहे. 

एकीकडे तो सीमेवर हल्ला करीत आहे आणि दुसरीकडे भारत अवलंब असल्याचा गैरफायदा घेऊ लागला आहे. API च्या किंमती वाढल्याने औषधांच्या किमती वेगाने वाढू लागल्या आहेत. Paracetamol ची किंमत 27 टक्के, ciprofloxacin ची किंमत 20 टक्के, penicillin G ची किंमत 20 टक्के याच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय प्रत्येक प्रकारच्या फार्मा प्रोडक्टच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ही दोस्ती तुटायची नाय! मधमाश्यांचा भन्नाट मित्र पाहिलात का?; Video पाहून हैराण व्हाल 

'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप

चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी

"चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा"

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! तब्बल 81 देशांमध्ये दुसरी लाट; WHO ने दिला गंभीर इशारा

मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा

 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतmedicineऔषधं