टेन्शन वाढलं! अफगाणिस्‍तानात चीननं उतरवली लढाऊ विमानं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 01:03 PM2021-10-04T13:03:05+5:302021-10-04T13:05:26+5:30

खरे तर, बाग्राम एअरबेस हा अमेरिकन लष्कराचा मजबूत गड होता. त्यांनी येथून अनेक ऑपरेशन्स केली आहेत. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य निघून गेल्यानंतर तेथे (बग्राम एअरबेस) लष्करी विमाने उतरल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत.

China military planes at bagram airbase in Afghanistan Taliban | टेन्शन वाढलं! अफगाणिस्‍तानात चीननं उतरवली लढाऊ विमानं?

टेन्शन वाढलं! अफगाणिस्‍तानात चीननं उतरवली लढाऊ विमानं?

Next

अमेरिकन लष्कर अफगाणिस्तानातून परत गेल्यानंतर, येथील बाग्राम एअरबेसवर  (Bagram Airbase) पहिल्यांदाच लष्करी विमाने उतरताना दिसली आहेत. ही चिनी लष्कराची विमाने असू शकतात, असा दावा करण्यात येत आहे. एवढेच नाही, तर आता बाग्राम एअरबेसचे लाइट्सदेखील सुरू करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकार...?

खरे तर, बाग्राम एअरबेस हा अमेरिकन लष्कराचा मजबूत गड होता. त्यांनी येथून अनेक ऑपरेशन्स केली आहेत. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य निघून गेल्यानंतर तेथे (बग्राम एअरबेस) लष्करी विमाने उतरल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. एवढेच नाही, तर काही छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यांत एअरबेसवर वीज पुरवठा पूर्ववत केल्याचे दिसत आहे.

सांगण्यात येते, की अमेरिकेने माघार घेतल्यानंतर आता चीन, या एयरबेसवर कब्जा करन्यास उत्सुक आहे. यादरम्यान बग्राम एयरबेसवरून अनेक लढाऊ विमानांनी उड्डाणही केले आहे आणि लँडिंगही केले आहे. ही विमाने चिनी सेन्याची असल्याचा दावा करण्यात येत आहे. कारण, तालिबानकडे अशी विमाने उडविण्याचा कसलाही अनुभव नाही. 

एवढेच नाही तर, यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टनुसार, चीन आपल्या लष्कराचे कर्मचारी आणि आर्थिक विकास अधिकाऱ्यांना बाग्राम एअरबेसवर पाठविण्याचा विचार करत आहे. मात्र, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या रिपोर्टचे खंडन केले आहे. 

Web Title: China military planes at bagram airbase in Afghanistan Taliban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.