कोरोना विषाणू संसर्गावरुन चीनने फाेडले भारतावर खापर; ड्रॅगनचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 03:03 AM2020-11-29T03:03:08+5:302020-11-29T07:20:47+5:30

‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका, भारतातून मासे घेऊन आलेल्या एका मोठ्या कंटेयनरमध्ये काेविड १९ विषाणू आढळल्याचा आधारही चीनने दिला आहे.

China lashes out at India over corona virus infection; Dragon's call | कोरोना विषाणू संसर्गावरुन चीनने फाेडले भारतावर खापर; ड्रॅगनचा कांगावा

कोरोना विषाणू संसर्गावरुन चीनने फाेडले भारतावर खापर; ड्रॅगनचा कांगावा

googlenewsNext

बीजिंग : अख्ख्या जगाला नामाेहराम करुन साेडणारा काेविड १९ विषाणच्या प्रसारासाठी चीनकडे बाेट ठेवण्यात आले. मात्र, चीनने ताे मी नव्हेच अशी भूमिका घेऊन जगाला संभ्रमित करतांना महामारीचे खापर भारतावर फाेडले आहे. या विषाणूचे उगमस्थान भारतात असल्याचा जावईशाेध चीनने लावला आहे.

चीनच्या ‘अकादमी ऑफ सायन्सेस’च्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे, की भारतात २०१९ मध्ये उन्हाळ्यात आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेदरम्यान प्राण्यांपासून मानवाला विषाणू संसर्ग झाला असावा. ज्या ठिकाणी विषाणूचे कमी म्युटेशन झाले आहे, तिथे विषाणूचा मूळ स्त्राेत असण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, भारत, बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, इटली, रशिया, झेक प्रजासत्ताक किंवा सर्बियामध्ये विषाणू जन्माला आल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. भारत आणि बांगलादेश या ठिकाणी कमी म्युटेशन आढळले आहे. त्यामुळे चीनने भारतावर खापर फाेडण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतातून मासे घेऊन आलेल्या एका मोठ्या कंटेयनरमध्ये काेविड १९ विषाणू आढळल्याचा आधारही चीनने दिला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकारांना सांगितले, की चीनमध्ये पहिला रूग्ण आढळला म्हणून चीनमधूनच विषाणूचा प्रसार झाला, असा अर्थ हाेत नाही. तो इथे अन्य देशातूनही आलेला असू शकतो.  (वृत्तसंस्था)

चीनचा दावा फेटाळला
चीनचा दावा ब्रिटनच्या ग्लासगाे विद्यापीठाच्या संशाेधकांनी फेटाळला आहे. चीनचे संशाेधन सदाेष असून ते काेराेना विषाणूबाबत आमच्या ज्ञानामध्ये कसलीही भर घालत नाही, असे संशाेधक डेव्हीड राॅबर्टसन यांनी सांगितले आहे. यापूर्वीही चीनने अमेरिका आणि इटलीवर खापार फाेडण्याचा प्रयत्न केला हाेता.

कांगावा कशासाठी ?
जागतिक आराेग्य संघटनेने मे महिन्यात काेविड १९ विषाणूचे उगमस्थान शाेधून काढण्याबाबत चाैकशी करण्याचा ठराव मंजूर केला हाेता. त्यानुसार आराेग्य संघटनेचे पथक चीनच्या दाैऱ्यावर येणार आहे. चीनने दाैऱ्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नसली तरीही दिशाभूल करण्याचे नियाेजनबद्ध प्रयत्न चीनने सुरू केले आहेत.
 

Web Title: China lashes out at India over corona virus infection; Dragon's call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.