चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:28 IST2025-11-08T16:27:36+5:302025-11-08T16:28:11+5:30
चीनने आपले तिसरे विमानवाहू जहाज फुजियान लाँच करून जगाला धक्का दिला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले ही युद्धनौका अमेरिकेशी तुलनात्मक आहे, यामुळे भारत आणि फिलीपिन्समध्ये चिंता निर्माण झाली आहे.

चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
मागील काही दिवसांपासून पॅसिफिक महासागरात तणाव सुरू आहे, या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीनने तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचे, "फुजियान" समु्द्रात उतरवली आहे. शनिवारी, चिनी पीएलए नौदलाने फुजियानच्या ऑपरेशनल डेमोचा व्हिडीओ जारी केला. या आठवड्यात, फुजियानचा कमिशनिंग समारंभ चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीत पार पडला.
चीनचे नवीन विमानवाहू जहाज इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापल्ट तंत्रज्ञानावर आधारित आहे. आतापर्यंत, हे तंत्रज्ञान फक्त यूएस जेराल्ड फोर्ड-क्लास विमानवाहू जहाजांवर वापरले जात होते. इलेक्ट्रॉनिक कॅटापल्ट तंत्रज्ञानामुळे लढाऊ विमानांना कॅरियरच्या शॉर्ट-रनवे डेकवरून उड्डाण आणि लँडिंग करु शकते.
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
चीनचा फिलीपिन्ससोबतचा तणाव
दक्षिण चीन समुद्रात फिलीपिन्ससोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने तिसऱ्या विमानवाहू युद्धनौका तयार केली आहे. गेल्या दोन वर्षांत, चीन आणि फिलीपिन्सच्या नौदलात अनेक हिंसक संघर्ष झाले आहेत. फिलीपिन्स अमेरिकेच्या चिथावणीवर चीनसोबत संघर्षाला चिथावणी देत आहे, असा चीनचा आरोप आहे.
चीन दक्षिण चीन समुद्र आणि तैवानबाबतही अधिकाधिक आक्रमक होत आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला ते तैवानवर हल्ला करणार नाहीत, असे आश्वासन दिल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या हालचाली सातत्याने वाढत असल्याने चीनचा तिसरा विमानवाहू युद्धनौका देखील भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. हिंद महासागरात चिनी युद्धनौका, सर्वेक्षण जहाजे आणि पाणबुड्या वारंवार दिसतात.
काही दिवसापूर्वी भारतीय नौदलाचे उपप्रमुख संजय वात्सयन यांनी सांगितले की, चिनी युद्धनौका हिंद महासागरात प्रवेश करण्यापासून ते बाहेर पडेपर्यंत बारकाईने पाळत ठेवल्या जातात. भारताकडे दोन विमानवाहू जहाजे आहेत. भारतीय नौदलाने तिसऱ्या विमानवाहू जहाजाची तयारी केली आहे.