...तर सहन करणंही कठीण होईल; चीनची भारताला पुन्हा धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 08:58 AM2020-06-12T08:58:38+5:302020-06-12T09:01:03+5:30

चीनने भारताला लक्ष करत अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला होता.

China has said that India will have to pay a heavy price if it loses a friend like China | ...तर सहन करणंही कठीण होईल; चीनची भारताला पुन्हा धमकी

...तर सहन करणंही कठीण होईल; चीनची भारताला पुन्हा धमकी

Next

चीनमधील वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरता थैमान घातलं आहे. जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण  74 लाख 47 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 18 हजार 870 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरस जागतीक महामारी बनला आहे. यामुळे जगातील सर्वच देश चीनला लक्ष्य करत आहेत. परंतु संपूर्ण जगाच्या टीकेला सामोरा जात असलेला चीन आता सर्वच देशांकडून घेरला जात आहे. मात्र, असे असतानाही त्याची मग्रुरी कमी झालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेंड वॉर सुरु आहे. तर दूसरीकडे अमेरिका आणि भारताची मैत्री आणखी घट्ट होत आहे. याचपार्श्वभूमीवर चीनने भारताला लक्ष करत अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला होता. तसेच भारताने अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काहीही पाऊल उचलंल तर कोरोनासारख्या महामारीसोबतच आर्थिक परिणाम देखील खूप खराब होतील, असा इशारा देखील चीनने भारताला दिला होता. याचदरम्यान आता पुन्हा चीनने भारताला धमकी दिली आहे.

चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये लिहिलं आहे की, मोदी सरकार चीनला मित्र मानत असेल तर चीन आणि भारतामधील आर्थिक संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मात्र भारताने चीनला कमी लेखण्यासाठी अमेरिकासोबत गेला तर चीन राजकीय असो किंवा आर्थिक कोणत्याही बाबतीत भारताचा विचार करणार नाही. तसेच भारताला चीनसारख्या मित्राला गमावण्याची मोठी किंमत चुकवावी लागेल आणि ते भारताला सहन करणंही कठीण होईल, असा इशारा चीनने भारताला दिला आहे.

ग्लोबल टाईम्सने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चुनिंग यांचे हवाल्याने सांगितले आहे की, चीन आणि भारत यांनी सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जात आहे. तसेच काही चिनी वृत्तपत्राने असे म्हटले आहे की, काही विश्लेषकांनी भारत आणि चीनच्या या भूमिकेचे  कौतुक केले आहे. सीमेवरील तणाव कमी झाल्याने दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारिक देवाण- घेवाण करण्यास संधी मिळेल, जे दोन्ही देशांसाठी महत्वाचे आहे.

दरम्यान, याआधी देखील अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला होता. भारताने अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांपासून दूर राहिल्यास चांगले होईल. भारताने अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काहीही पाऊल उचलंल तर कोरोनासारख्या महामारीसोबतच आर्थिक परिणाम देखील खूप खराब होतील, असा इशारा चीनने भारताला दिला होता. भारतासोबत सुरु असलेल्या व्यवसायात आणखी चांगले संबंध राखण्याचे आमचे लक्ष असल्याचे देखील चीनकडून सांगण्यात आले आहे.

अमेरिकेने चीनवर घातले निर्बंध -

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही चीनी नागरिकांवर अमेरिकेत येण्यासाठी निर्बंध घालणार असल्याची घोषणा केली आहे.  एवढेच नाही, तर चीनमधून अमेरिकेत होणाऱ्या गुंतवणुकीचे नियमही  कठोर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकन काँग्रेसमध्ये चीनविरोधात कठोर पावले उचलण्यासंदर्भात एक विधेयकही सादर करण्यात आले आहे.

Web Title: China has said that India will have to pay a heavy price if it loses a friend like China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.