China gets Soften on Masood Azhar case | मसूद अझहर प्रकरणी चीन नरमला; चर्चेतून मार्ग काढण्याचे वक्तव्य
मसूद अझहर प्रकरणी चीन नरमला; चर्चेतून मार्ग काढण्याचे वक्तव्य

बिजिंग : पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यावरून चीन नरमला आहे. या मुद्द्यावर योग्य प्रकारे उपाय करण्य़ाचे संकेत चीनने दिले आहेत. मात्र, यासाठी चीनने कोणतीही वेळेची सीमा दिलेली नाही. पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या चीन दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनने ही भुमिका मांडली आहे. याआधी चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये वीटो वापरून अडचणी निर्माण केल्या होत्या. 


चीनने मार्चमध्ये चारवेळा या प्रस्तावाला रोखले होते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. यामध्ये मसूद अझहरचे नाव आले होते. यावेळी फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने हा प्रस्ताव दिला होता. या मुद्द्यावर आता चीनने सांगितले की, हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले जाईल. चीनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी हे सांगितले आहे.
फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने दाखल केलेल्या प्रस्तावाचा विरोध मागे घेत असल्याच्या वृत्तांवर हे वक्तव्य आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये 1267 अल कायदा प्रतिबंध समितीनुसार हा प्रस्ताव आणला गेला आहे. चीनने पुन्हा अडचणी आणल्याने फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने दबाव आणला आहे. 


Web Title: China gets Soften on Masood Azhar case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.