China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:57 IST2025-12-12T13:55:22+5:302025-12-12T13:57:29+5:30

China Tax on Condom: तीन दशकांनंतर चीनमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक औषधींवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जाणार आहे. पण, शी जिनपिंग यांच्या निर्णयाला आता विरोधही होऊ लागला आहे. 

China Condom Tax: China will impose a heavy tax on condoms, why is there opposition to Jinping's policy? | China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?

China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?

China Tax Condom News: तीन दशकानंतर चीनमध्ये एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. चीनमध्ये ३० वर्षांनंतर पहिल्यांदा कंडोम आणि गर्भनिरोधक औषधींवर टॅक्स लावला जाणार आहे. हा टॅक्स व्हॅटच्या स्वरुपातील असणार आहे. जगभरात सेफ सेक्स आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी जगभरात कंडोम आणि गर्भनिरोध औषधी वापरण्याला प्रोत्साहन दिले जात असताना चीनकडून कंडोम महागडे करण्याचा निर्णय का घेत आहे, असा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

एपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, चीनच्या नवीन व्हॅट कायद्यानुसार गर्भनिरोधक औषधी आणि इतर संबंधित उत्पादने (उदा. कंडोम) १ जानेवारी २०२६ पासून टॅक्स फ्री असणार नाही. आता कंडोमवरही इतर वस्तूंप्रमाणे १३ टक्के टॅक्स आकारला जाणार आहे. 

कंडोम, गर्भनिरोधक औषधींवर टॅक्स लावण्याचा निर्णय का?

चीन सरकारने असा निर्णय घेण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे देशात जन्मदराला चालना देणे. चीनने कधीकाळी असा कायदा केला होता की, एकाच मुलाला जन्म देऊ शकतील. २०१५ मध्ये सरकारने हा निर्णय बदलला आणि विवाहित दाम्पत्य दोन मुलं जन्माला घालू शकतात, असा निर्णय जारी केला. 

चीनमधील लोकसंख्या वाढ सर्वोच्च पातळीवर पोहचल्यानंतर पुन्हा घटू लागल्यानंतर सरकारने आणखी एक निर्णय घेतला. सरकारने दोन मुलांना जन्म देण्याचा निर्णय बदलून तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी दिली. तरीही जन्मदर वाढलेला नाही. जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या कमीच आहे. 

चीनमध्ये २०२४ मध्ये किती मुले जन्माला आली?

चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये चीनमध्ये ९५ लाख मुले जन्माला आली होती. २०१९ मध्ये जन्माला आलेल्या मुलांच्या संख्येच्या तुलनेत ती एक तृतीयांश कमी आहे. २०१९ मध्ये चीनमध्ये १.४७ कोटी मुले जन्माला आली होती. 

त्यामुळेच आता सरकारकडून गर्भनिरोधक साधनांचा वापर कमी केला जावा म्हणून टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे. महाग झाल्यामुळे लोक कंडोम, गर्भनिरोधी गोळ्या आणि इतर साधनांचा वापर कमी करतील आणि जन्मदर वाढेल, अशा उद्देशाने हा निर्णय घेतला गेला आहे. 

जिनपिंग यांच्या निर्णयावर टीका

चीन सरकारच्या या निर्णयावर तज्ज्ञांकडून टीका होत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, किंमती वाढल्यामुळे लोक या साधनांचा वापर कमी करतील. पण, यामुळे नियोजन न करता होणारी गर्भधारणा आणि शरीरसंबंधामुळे पसरणाऱ्या रोगांमध्ये वाढ होईल. 

Web Title : चीन में कंडोम पर टैक्स: जन्म दर बढ़ाने का विवादास्पद कदम

Web Summary : चीन ने जन्म दर को प्रोत्साहित करने के लिए 2026 से कंडोम और गर्भ निरोधकों पर कर लगाने का फैसला किया है, जो दशकों पुरानी नीति के विपरीत है। आलोचकों को अनियोजित गर्भधारण और एसटीआई बढ़ने का डर है। परिवार के आकार की सीमा में ढील के बावजूद जन्म दर में गिरावट आई है।

Web Title : China to Tax Condoms: A Controversial Move to Boost Birth Rate

Web Summary : China will tax condoms and contraceptives from 2026 to encourage births, reversing decades of policy. Critics fear increased unplanned pregnancies and STIs. The birth rate has declined despite relaxed family size limits.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.