बीजिंग - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जागतिक चलनात डॉलरच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिले आहे. त्यांनी चीनचं युआन चलन मजबूत चलन बनवण्याचं आवाहन केले आहे. युआनला इथपर्यंत मजबूत केले जाईल की इतर देश इंटरनॅशनल रिझर्व्ह म्हणून ते जमा करतील असं जिनपिंग यांनी म्हटलं आहे. सध्या जगभरात डॉलरचं वर्चस्व आहे. त्यात शी जिनपिंग यांचं हे विधान डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान मानले जात आहे. जगातील पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेमधील हा संघर्ष जागतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
अमेरिकेनंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था असलेला चीन अमेरिकन डॉलरवरील निर्भरता कमी करून जागतिक व्यापारात युआनचा वापर वाढवत आहे. मागील वर्षी चीनने ६.२ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या परदेशी व्यापारात जवळपास एक तृतीयांश हिस्सा त्यांच्या स्थानिक चलनात केला होता. शनिवारी सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाचं प्रमुख सैद्धांतिक जर्नल किउशीत छापलेल्या लेखात जिनपिंग यांनी म्हटलंय की, चीनला एक मजबूत चलन बनवण्याची गरज आहे. ज्याचा वापर जागतिक बाजारासाठी केला जाईल. गुंतवणूक आणि फॉरेन एक्सचेंजमध्येही मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जाऊ शकतो. जे ग्लोबल रिझर्व्हचा दर्जा मिळवेल असं त्यांनी सांगितले.
ग्लोबल रिझर्व्ह काय असते?
ग्लोबल रिझर्व्ह असं चलन असते जे जगभरातील सरकारे, केंद्रीय बँका आणि जागतिक अर्थ संस्था मोठ्या प्रमाणात परदेशी चलन म्हणून साठा करते. या चलनाचा साठा आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक, कर्ज फेडणे, जागतिक व्यवहारांसाठी वापरला जातो. सोप्या शब्दात हे जगातील सर्वात विश्वासनीय आणि स्वीकारलेले चलन असते, जे जवळपास सर्वच देश सुरक्षित समजून साठा करत असतात. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन डॉलर हे जगातील प्रमुख ग्लोबल रिझर्व्ह चलन बनले आहे. IMF नुसार जागतिक चलन साठ्यात डॉलरची भागीदारी आजही जवळपास ५८ ते ६० टक्के इतकी आहे.
हा, पण जिनपिंग यांनी थेट अमेरिकन डॉलरचा त्यांच्या लेखात उल्लेख केला नाही. २०१२ मध्ये सत्तेत आल्यापासून चीनचे राष्ट्रपती जिनपिंग युआनला डॉलरच्या तुलनेत परदेशी चलन बनवण्यासाठी जोर देत आहेत. बँकिंग एसेट्स, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आणि कॅपिटल मार्केटमध्ये चीन जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. पण एकूण मिळून हे मोठे आहे परंतु मजबूत नाही. चीन, रशिया एकत्र मिळून SWIFT इंटरनॅशनल बँक नेटवर्कला पर्याय म्हणून क्रॉस बॉर्डर इंटरबँक पेमेंट सिस्टमला चालना देत आहेत. रशियातील तेल, गॅसचा सर्वात मोठा खरेदीदार या नात्याने चीन रशियासोबत द्विपक्षीय व्यापारात युआनच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. चीनने स्थानिक चलनात व्यापार सोपा बनवण्यासाठी तब्बल ५० देशांच्या चलनासोबत करार याआधीच केला आहे.
मागील एका वर्षात युआन डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला आहे. तरीही एका रिपोर्टनुसार युआन डॉलरच्या तुलनेत आजही योग्य किंमत २५ टक्के खाली ट्रेड करू शकतो असं गोल्डमॅन स्नॅक्स तज्ज्ञांनी म्हटलं. SWIFT बद्दल बोलायचे तर SWIFT पेमेंट सिस्टम हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय पेमेंट मेसेजिंग नेटवर्क आहे. SWIFT म्हणजे Society for Worldwide Interbank Financial Telecommunication ही १९७३ मध्ये बेल्जियममध्ये स्थापन झालेली एक सहकारी संस्था आहे. जी बँकांद्वारे चालवली जाते.
बीजिंग आणि मॉस्को हे BRICS मध्ये एक कॉमन BRICS चलन आणि SWIFT ला टक्कर देण्यासाठी ब्रिक्स पेमेंट सिस्टम आणण्यावर जोर देत आहेत. ब्रिक्स आता १० देशांचा समुह आहे. ज्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेसह ५ नव्या देशांचा सहभाग आहे. परंतु जर ब्रिक्स देशांनी डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या योजना आखल्या तर अमेरिका त्यांच्यावर मोठे टॅरिफ आकारतील अशी धमकी अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
Web Summary : Xi Jinping aims to elevate the Yuan, challenging the dollar's global dominance. China boosts Yuan usage in trade, seeks global reserve status, and partners with Russia on alternative payment systems. BRICS nations consider a joint currency, facing potential US tariffs.
Web Summary : शी जिनपिंग युआन को मजबूत करने और डॉलर के वैश्विक वर्चस्व को चुनौती देने का लक्ष्य रखते हैं। चीन व्यापार में युआन का उपयोग बढ़ाता है, वैश्विक आरक्षित स्थिति चाहता है, और वैकल्पिक भुगतान प्रणालियों पर रूस के साथ भागीदारी करता है। ब्रिक्स राष्ट्र संयुक्त मुद्रा पर विचार कर रहे हैं, अमेरिका टैरिफ लगा सकता है।