चीनमध्ये भीषण बस अपघात, 36 ठार 13 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 11:05 IST2017-08-11T07:30:16+5:302017-08-11T11:05:09+5:30

China catches a bus accident, 13 killed, 13 injured | चीनमध्ये भीषण बस अपघात, 36 ठार 13 जखमी

चीनमध्ये भीषण बस अपघात, 36 ठार 13 जखमी

बीजिंग, दि. 11 - चीनमधील शानाक्सी प्रांतात गुरुवारी रात्री झालेल्या भीषण बस  अपघातात 36 जण ठार तर 13 जण जखमी झाले. रात्री 11.34 च्या सुमारास अनकांग शहरात हा अपघात घडला. ल्युओयांग शहराच्या दिशेने वेगात जाणा-या बसने बिजींग-कुनमिंग एक्सप्रेस वे वरील बोगद्याच्या भिंतीला जोरदार धडक दिली. 
बसमध्ये 49 प्रवासी होते. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोगद्याच्या तोंडावरच हा अपघात घडला. बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघात प्रवण क्षेत्र असल्याने वाहने संभाळून चालवता असे फलकही या मार्गावर लावले होते. तरीही हा अपघात घडला. 


Web Title: China catches a bus accident, 13 killed, 13 injured