China US sea fight : दक्षिण चीन समुद्रातील स्कारबोरो शोलजवळ चिनी आणि अमेरिकन सैनिकांमध्ये चकमक झाली. चीनचे म्हणणे आहे की या सर्वात व्यस्त मार्गावरून एक अमेरिकन विनाशकारी जहाज जात होते, ज्याला आम्ही आमच्या सागरी क्षेत्रातून हाकलून लावले. चीनने अमेरिकेवर स्कारबोरो शोलमध्ये घुसखोरी केल्याचा आरोपही केला आहे. फिलीपिन्समुळे स्कारबोरोजवळ दोन चिनी जहाजे टक्कर झाल्याच्या घटनेच्या एक दिवसानंतरच स्कारबोरो शोल येथे अमेरिका आणि चीनच्या सैनिकांमध्ये ही चकमक झाली.
चीनने म्हणणे काय?
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, चीनी सैन्याचे म्हणणे आहे की अमेरिका ज्या पद्धतीने स्कारबोरो शोलमध्ये घुसखोरी करत आहे, ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे. अमेरिकेने स्कारबोरोच्या माध्यमातून चीनच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान दिले आहे. चीनच्या दक्षिणी लष्करी कमांडने म्हटले आहे की, बुधवारी यूएसएस हिगिन्सने परवानगीशिवाय स्कारबोरो शोलमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्याला इशारा देण्यात आला, परंतु अमेरिकन जहाजाने मार्गक्रमण सुरूच ठेवले. त्यानंतर त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. चीनचे म्हणणे आहे की अमेरिकेने त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षेचे उल्लंघन करणे ही गंभीर बाब आहे.
अमेरिकेकडून स्पष्टीकरण
अमेरिकेचे म्हणणे आहे की त्यांनी स्कारबोरोमध्ये प्रवेश करताना आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केले. अमेरिकेच्या सातव्या फ्लीटचे म्हणणे आहे की जहाजाचे मार्गक्रमण हे नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य आणि समुद्राचा कायदेशीर वापर राखण्यासाठी अमेरिकेच्या वचनबद्धतेचा भाग होती.
स्कारबोरोमध्ये चीन-अमेरिका संघर्ष का आहे?
स्कारबोरो हे दक्षिण चीन समुद्रातील फिलीपिन्सच्या लुझोन बेटाच्या पश्चिमेस सुमारे २२० किलोमीटर अंतरावर असलेले एक उथळ बेट आहे. हे बेट दक्षिण चीन समुद्रातील सर्वात वर्दळीचे बेट असल्याचे म्हटले जाते. फिलीपिन्स, चीन आणि तैवान या बेटावर दावा करतात. २०१२ मध्ये, चीनने येथे आपले सैन्य उतरवून फिलीपिन्सचा प्रवेश मर्यादित केला. दक्षिण चीन समुद्रात आपल्या मित्र राष्ट्रांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका सतत सक्रिय आहे. चीनच्या नियंत्रणाला आव्हान देण्यासाठी अमेरिका वेळोवेळी जहाजे पाठवताना दिसते.