प्रमुख स्वामी महाराज होते मानवतावादी, नि:स्वार्थी : महंत स्वामी महाराज, अमेरिकेत अक्षरधाम मंदिरात महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 04:48 IST2023-09-01T04:47:50+5:302023-09-01T04:48:17+5:30

प्रमुख स्वामी महाराजांच्या काही आठवणी महंत स्वामी महाराज यांनी सांगितल्या.

Chief Swami Maharaj Was Humanitarian, Selfless : Mahant Swami Maharaj, Festival at Akshardham Temple in America | प्रमुख स्वामी महाराज होते मानवतावादी, नि:स्वार्थी : महंत स्वामी महाराज, अमेरिकेत अक्षरधाम मंदिरात महोत्सव

प्रमुख स्वामी महाराज होते मानवतावादी, नि:स्वार्थी : महंत स्वामी महाराज, अमेरिकेत अक्षरधाम मंदिरात महोत्सव

न्यूजर्सी : अमेरिकेत न्यूजर्सी येथील रॉबिन्सविले भागातील बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात आयोजिलेल्या महोत्सवात असंख्य भाविकांनी २५ ऑगस्ट रोजी प्रमुख स्वामी महाराजांना आदरांजली अर्पण केली. प्रमुख स्वामी महाराज हे मानवतावादी, नि:स्वार्थी व सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणारे होते असे बीएपीएसचे विद्यमान प्रमुख महंत स्वामी महाराज यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.

प्रमुख स्वामी महाराजांच्या काही आठवणी महंत स्वामी महाराज यांनी सांगितल्या. ते म्हणाले की, प्रमुख स्वामी महाराज हजरजवाबी तसेच अतिशय शांत प्रवृत्तीचे होते. त्यांचे परमेश्वराशी खऱ्या अर्थाने नाते जुळलेले होते.  प्रमुख स्वामी महाराजांमधील अलौकिक गुणांचे महत्त्व नेहमीच सर्वांना जाणवत राहील, असे महंत स्वामी महाराजांनी सांगितले.

प्रमुख स्वामी महाराजांच्या अनेक वर्षे निकट संपर्कात असलेले सद्गुरू पूज्य ईश्वरचरणदास स्वामी यांनी सांगितले की, प्रमुख स्वामी महाराज अतिशय कर्तृत्ववान व्यक्ती होते. मात्र, त्यांनी आपल्या सर्व कार्याचे श्रेय नेहमी देवाला दिले. (वृत्तसंस्था)

क्लिंटन यांनी घेतली होती प्रमुख स्वामी महाराजांची भेट
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरात प्रमुख स्वामी महाराजांची भेट घेतली होती. त्यावेळी या शिष्टमंडळात डॅनी गायकवाड डेव्हलपमेंट्स अँड इन्व्हेस्टमेंट्सचे संस्थापक दिग्विजय डॅनी गायकवाड यांचा समावेश होता. प्रमुख स्वामी महाराजांशी झालेल्या भेटीचा प्रसंग गायकवाड यांनी रॉबिन्सविले येथील कार्यक्रमात श्रोत्यांना सांगितला. 

Web Title: Chief Swami Maharaj Was Humanitarian, Selfless : Mahant Swami Maharaj, Festival at Akshardham Temple in America