शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजन म्हणतो, भारतात परतायचेय

By admin | Updated: October 29, 2015 22:12 IST

पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त फेटाळून लावत अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने तो भारतात परतू इच्छित असल्याचे म्हटले आहे.

बाली (इंडोनेशिया) : पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त फेटाळून लावत अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने तो भारतात परतू इच्छित असल्याचे म्हटले आहे. ‘दाऊद इब्राहीमसह इतर शत्रू टोळ्यांकडून जिवाला धोका असल्याने भारतीय गुप्तचरांशी करार करून तू आत्मसमर्पण केल्याचे बोलले जाते. त्यात तथ्य आहे का’, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर ‘मी शरण आलो नाही’, असे उत्तर राजनने दिले. दाऊदची भीती वाटत नसल्याचाही त्याने पुुनरुच्चार केला. मला येथे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ते मला साखळदंडांनी जखडून ठेवतात. मला भारतात परतायचे आहे, असे तो म्हणाला. राजेंद्र सदाशिव निकाळजे असे राजनचे खरे नाव असून तो ५५ वर्षांचा आहे. छोटा राजनचे झिम्बाब्वेत व्यवसाय असल्याचे बोलले जाते. इंडोनेशियात अटक झाल्यानंतर तो मला झिम्बाब्वेला जाऊ द्या, अशी विनवणी करत होता, असे वृत्त आले होते. राजनने हे वृत्त फेटाळून लावले. मी झिम्बाब्वेला जाऊ इच्छित नाही, असे तो म्हणाला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा एकेकाळी उजवा हात असणारा राजन नंतर त्याचा क्रमांक एकचा शत्रू झाला. दाऊद हा १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. मी दाऊदला भीत नाही. मी सीबीआय कधी येथे येते याची प्रतीक्षा करत आहे, असे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)