PM Modi: विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी दिल्या खास भेटवस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:49 IST2025-06-20T12:47:59+5:302025-06-20T12:49:57+5:30
जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा दौऱ्यावर गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांना भारतीय परंपरांचे प्रतीक असलेल्या भेटवस्तू दिल्या.

PM Modi: विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी दिल्या खास भेटवस्तू
नवी दिल्ली: जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा दौऱ्यावर गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांना भारतीय परंपरांचे प्रतीक असलेल्या भेटवस्तू दिल्या. यात हजारो वर्षांपूर्वीच्या धातू गाळून वस्तू तयार करण्याच्या कलेतून साकारलेला डोकरा नंदी, बलुआ पाषाणात कोरलेली कोणार्क चक्राची प्रतिकृती, कोल्हापुरी चांदीपासून तयार केलेला एक आकर्षक कुंभ इत्यादी वस्तूंचा समावेश होता. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यन्युएल मॅक्रॉन यांना डोकरा नंदीची मूर्ती भेट म्हणून दिली.
कोणत्या नेत्याला काय दिली भेट?
- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांना कोल्हापुरी चांदीपासून तयार करण्यात आलेला एक कुंभ देण्यात आला.
- कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना पितळाच्या बोधीवृक्षाची आकर्षक प्रतिकृती दिली.
- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष लीजे म्युंग यांना मधुबनी पेंटिंग भेट देण्यात आली.
- मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लाउडिया शाईनबाम पर्डो यांना एक वारली पेंटिंग भेट म्हणून दिली.
- ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लूला यांना बाबूपासून तयार केलेली नाव कोन स्वान (हंस) दिली.
- दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांना छत्तीसगडच्या कारागिरांनी पितळापासून तयार केलेला एक श्वान भेट दिला.