शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
2
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
3
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
4
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
5
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
6
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
7
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
8
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
9
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
10
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
11
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
12
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
13
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
14
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
15
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
16
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
17
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
18
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
19
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
20
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

Cedric McMillan : ट्रेडमिलवर धावत असताना प्रसिद्ध बॉडीबिल्डर सेड्रिक मॅकमिलन यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:11 PM

Cedric McMillan : अमेरिकेत राहणारे सेड्रिक मॅकमिलन हे एक प्रोफेशनल बॉडीबिल्डर तसेच यूएस आर्मीचे इंस्ट्रक्टर (US Army Instructor) सुद्धा होते.

प्रसिद्ध बॉडीबिल्डर सेड्रिक मॅकमिलन (Cedric McMillan) यांचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन झाले आहे. रिपोर्टनुसार, ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मॅकमिलन हे आधीच हृदयासंबंधी आणि लाँग कोविड (Long Covid) समस्यांशी झुंज देत होते. मॅकमिलन यांच्या मृत्यूची बातमी त्याच्या एका स्पॉन्सरने दिली. दरम्यान, अमेरिकेत राहणारे सेड्रिक मॅकमिलन हे एक प्रोफेशनल बॉडीबिल्डर तसेच यूएस आर्मीचे इंस्ट्रक्टर (US Army Instructor) सुद्धा होते.

2017 मध्ये अरनॉल्ड क्लासिक बॉडीबिल्डिंगचे टायटल (Arnold Classic Bodybuilding Title) जिंकून त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली होती. Generation Iron च्या रिपोर्टनुसार, बॉडीबिल्डर मॅकमिलन यांना ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मॅकमिलन यांना कोविडचा (COVID-19) बराच काळ त्रास होत असल्याचे सांगण्यात आले होते. 2020 मध्ये बरे झाल्यानंतरही लाँग कोविडशी संबंधित समस्यांना तोंड देत होते. याशिवाय, त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. त्यांना एक-दोनदा रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते.

28 फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, मॅकमिलन यांनी आपल्या शरीराशी संबंधित काही समस्या स्पष्ट केल्या. ते म्हणाले होते की, 'मी काही कारणास्तव पोटात अन्न ठेवू शकत नाही. मी जेंव्हा काही खातो किंवा पितो तेंव्हा उचक्या यायला लागतात. पोटात काहीही थांबू शकत नाही.' मॅकमिलन यांना स्पॉन्सर करणाऱ्या एक कंपनीने (Black Skull USA) बुधवारी इन्स्टाग्रामवर त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. 'तुम्‍हाला कळवण्‍यास आम्‍हाला खेद वाटतो की आमचा मित्र आणि भाऊ सेड्रिक मॅकमिलन यांचे आज निधन झाले. अॅथलीट, मित्र आणि वडील म्हणून सेड्रिकची खूप आठवण येईल', असे कंपनीने म्हटले आहे. 

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवAmericaअमेरिका