पतीची गर्लफ्रेंड चालवायची कार; ई-चलान पत्नीच्या हाती लागलं अन् प्रेमाचा बुरखाच फाटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 16:29 IST2021-12-13T16:23:17+5:302021-12-13T16:29:43+5:30

जर्मनीत राहणाऱ्या सदर विवाहित व्यक्तीकडे बीएमडब्ल्यू कार होती.

Car e-challan reveals that a married woman in Germany is cheating on her husband | पतीची गर्लफ्रेंड चालवायची कार; ई-चलान पत्नीच्या हाती लागलं अन् प्रेमाचा बुरखाच फाटला

पतीची गर्लफ्रेंड चालवायची कार; ई-चलान पत्नीच्या हाती लागलं अन् प्रेमाचा बुरखाच फाटला

जर्मनीत ई-चलानमुळे एका पतीची पोलखोल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जर्मनीत एका विवाहित महिलेची तिचा पती फसवणूक करत असल्याचं कारच्या ई-चलानामुळे उघड झालं आहे. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घ्या.

जर्मनीत राहणाऱ्या सदर विवाहित व्यक्तीकडे बीएमडब्ल्यू कार होती. दोघं एकत्र असताना ती कार कधीकधी त्याची गर्लफ्रेंड चालवायची. परंतु कारची स्पीड जास्त असल्यामुळे दंड म्हणून ई-चलान भरण्यासाठी मेसेज आला. या चलानची नोटीस सदर व्यक्तीच्या पत्नीच्या हाती लागली आणि एकच गोंधळ उडाला. 

ई-चलान नोटीसच्या फोटोमध्ये पतीची गर्लफ्रेंड कार चालवत असल्याचे दिसून आले. फोटो पाहून तिला धक्काच बसला. महिलेने नोटीस उघडून पाहिल्यानंतर तिला संपूर्ण प्रकरण समजले. चलानच्या नोटीसमध्ये त्यावेळी कार चालवणाऱ्या मुलीचा फोटो होता. ही मुलगी दुसरी कोणी नसून महिलेच्या पतीची गर्लफ्रेंड होती. 

पतीची गर्लफ्रेंड बीएमडब्ल्यू कार चालवत असताना हायवेवर बसवण्यात आलेल्या स्पीड कॅमेऱ्यात तिचे छायाचित्र कैद झाले होते. कारण ती गाडी ओव्हर स्पीडने चालवत होती. वाहतूक पोलिसांनी मुलीच्या फोटोसह दंडाची रक्कम कार मालकाच्या घरी पाठवली. यामुळे सदर विवाहीत पतीची पोल उघड झाली.

Web Title: Car e-challan reveals that a married woman in Germany is cheating on her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.