शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

कॅन्सरचे निदान आता वेदनारहित, बोन बायोप्सीपासुन होणार सूटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 18:05 IST

आता केवळ एका प्लास्टिक चिपच्या मदतीने रक्ताची चाचणी करुन कर्करोगाचे निदान करता येणार आहे. वेदना देणाऱ्या बायोप्सीपेक्षा अत्यंत चांगला उपाय रुग्णांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देइंटिग्रेटिव्ह बायोलॉजी या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये यातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. रक्ताची चाचणी एका चिपच्या साहाय्याने करुन बोन बायोप्सीप्रमाणे सर्व निरीक्षणे नोंदवण्याची सोय होणार आहे.  

न्यू यॉर्क- कर्करोगाची शंका आली तरी रुग्ण मनातून खचून जातो. वेदना, त्याच्या तपासण्या व उपचाराचे खर्च आणि विविध परिणाम होणारे उपचार यामुळे ही स्थिती अधिकच वाईट होते. मात्र आता केवळ एका प्लास्टिक चिपच्या मदतीने रक्ताची चाचणी करुन कर्करोगाचे निदान करता येणार आहे. वेदना देणाऱ्या बायोप्सीपेक्षा अत्यंत चांगला उपाय रुग्णांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.मल्टिपल मायेलोमा या कर्करोगामध्ये रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मावर परिणाम होतो त्यामुळे रुग्णाला बोन बायोप्सीला सामोरे जावे लागते. या बायोप्सीमध्ये डॉक्टर एक सुई हाडामध्ये खुपसून बोन मॅरोचा नमुना घेतात किंवा कधीकधी हाडाचा थोडा भागही बाजूला काढावा लागतो. ल्युकेमिया सारख्या कर्करोगाच्या अनेक प्रकारांमध्ये बोन बायोप्सी केली जाते.मात्र आता नव्या शोधामुळे यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये यातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. रक्ताची चाचणी एका चिपच्या साहाय्याने करुन बोन बायोप्सीप्रमाणे सर्व निरीक्षणे नोंदवण्याची सोय होणार आहे.  यामुळे कर्करोग कोणत्या तीव्रतेचा आहे, कोणत्या प्रकारची औषधे रुग्णाला दिली जावीत तसेच पुन्हा रोगाची तीव्रता वाढण्याबाबत तज्ज्ञांना माहिती मिळणार आहे.कान्सास विद्यापीठामध्ये याबाबत संशोधन करणारे स्टीव्हन सोपर यांनी या चाचणीबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, गेली दहा वर्षे मी रक्ताच्या चाचणीद्वारे विविध कर्करोगांच्या निदान करण्याच्या पद्धतीसाठी संशोधन करत आहे, ल्युकेमिया हा त्यापैकीच एक आहे. बोन मॅरो बायोप्सीला यामुळे टाळता येणार आहे आणि केवळ रक्ताच्या नमुन्याद्वारे ही चाचणी शक्य आहे. नव्या चिपच्या संशोधनामुळे चांगल्याप्रकारे चाचणी करता येते. 

टॅग्स :cancerकर्करोगmedicineऔषधंInternationalआंतरराष्ट्रीय