शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्यासाठी पाठवलं होतं विषारी पत्र; आता महिलेला भोगावा लागणार २२ वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 15:51 IST

न्यायालयाचे न्यायाधीश डॅबनी फ्रेडरिक यांनी पास्केल फेरीयरला सांगितले की, तुमची कृती तुमच्यासाठी आणि समाजासाठी हानिकारक आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विषारी पत्र पाठवणाऱ्या एका महिलेला न्यायालयाने २२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पास्केल फेरियर असे या शिक्षा सुनावलेल्या दोषी महिलेचे नाव आहे. पास्केल फेरियर हिने स्वतः आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्यासाठी एक पत्र पाठविले होते. या पत्रात तिने विष वापरले होते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, पास्केल फेरियरची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तिला अमेरिकेतून हद्दपार केले जाईल. यावेळी न्यायालयाचे न्यायाधीश डॅबनी फ्रेडरिक यांनी पास्केल फेरीयरला सांगितले की, तुमची कृती तुमच्यासाठी आणि समाजासाठी हानिकारक आहे.

दोषी पास्केल फेरियरकडे फ्रान्स आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे. पास्केल फेरियरने न्यायालयात योजना अयशस्वी झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच, न्यायालयाला दिलेल्या प्रदीर्घ भाषणात तिने असेही म्हटले की, ती स्वतःला दहशतवादी म्हणून पाहत नाही तर एक कार्यकर्ता म्हणून पाहते. "मला माझे ध्येय साध्य करण्यासाठी शांततापूर्ण मार्ग शोधायचे आहेत", असे पास्केल फेरियर म्हणाली. न्यायाधीश डॅबनी फ्रेडरिक यांनी पास्केल फेरियरला २२ वर्षांपेक्षा कमी म्हणजे २६२ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दरम्यान, एफबीआयला डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रावर पास्केल फेरियरच्या बोटांचे ठसे सापडले होते. 

सप्टेंबर २०२० मध्ये न्यूयॉर्क सीमा ओलांडताना पास्केल फेरियरला अटक करण्यात आली होती. यावेळी तिच्याजवळ बंदूक, चाकू आणि दारूगोळा होता. नंतर पास्केल फेरियरने क्युबेक येथील घरी रायसिन व एरंडाच्या बियांच्या घटकांपासून बनवलेले विष पत्रासह लिफाफ्यात ठेवल्याचे कबूल केले. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, या विषामुळे ३६ ते ७२ तासांच्या आत मृत्यू होऊ शकतो. हे डोसवर अवलंबून असते. दरम्यान, २०१४ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि इतर अधिकार्‍यांना रायसिन युक्त पत्रे पाठवल्यामुळे मिसिसिपीच्या एका व्यक्तीला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी