संसदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान लघुशंका करताना दिसले खासदार, एकाच महिन्यात दुसरी चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 13:57 IST2021-05-29T13:55:15+5:302021-05-29T13:57:10+5:30
ते एकाच महिन्यात दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान नग्न दिसून आले. त्यानंतर त्यांनी आपला राजीमाना देण्याचा प्रस्ताव ठेवला.

संसदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान लघुशंका करताना दिसले खासदार, एकाच महिन्यात दुसरी चूक
कॅनडाच्या हाउस ऑफ कॉमन्सचा झूम कॉन्फरन्स कॉल सुर होता. सर्व खासदार आपापले सल्ले-सूचना देत होते आणि आपले विचार मांडत होते. अशातच अचानक एक खासदार झूम कॉलदरम्यान लघुशंका करताना दिसून आला. त्यामुळे एक वेगळ्याच लाजिरवाण्या क्षणाचा सर्वांना सामना करावा लागला. व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान लघुशंका करताना दिसणारे खासदार हे पंतप्रधान जस्टि टूडो यांच्या लिबरल पार्टीचे विलियम अमोस हे होते. ते एकाच महिन्यात दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान नग्न दिसून आले. त्यानंतर त्यांनी आपला राजीमाना देण्याचा प्रस्ताव ठेवला.
हाऊस ऑफ कॉमन्सच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाजाचा आढावा घेणं सुरू होतं. यादरम्यान पंतप्रधान जस्टिन टूडो यांच्या लिबरल पार्टीचे खासदार विलियम अनोस लघुशंका करताना दिसून आले. विलियम अमोसने गुरूवारी रात्री आपल्या ट्विटरवर एक पोस्ट टाकून लिहिले की, 'मी संसदेच्या कामाकाजादरम्यान लघुशंका करत होतो. तेव्हा मला वाटलं होतं की, माझा कॅमेरा बंद आहे. पण नंतर माझी चूक माझ्या लक्षात आली. मी या माझ्या चुकीसाठी माफी मागतो'.
आधीही खासदार नग्न दिसला होता
याआधी एप्रिलमध्येही विलियम अमोस व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होत असलेल्या संसदेच्या कार्यावेळी नग्न अवस्थेत दिसले होते. तेव्हा व्हर्चुअल सेशन दरम्यान अमोसच्या लॅपटॉपचा कॅमेरा सुरू झाला आणि इतर सदस्यांना तो स्क्रीनवर नग्न अवस्थेत दिसत होता. द कॅनेडियन प्रेसला मिळालेल्या एका स्क्रीनशॉटमद्ये तो डेस्कच्या मागे उभा दिसत आहे. अमोससोबत घडलेली एकाच महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
त्यांनी माफी मागत ट्विटमध्ये म्हटले होते की, 'मी आज खरंच फार मोठी चूक केली आहे. मी त्यासाठी माफी मागतो. जॉजिंग करून आल्यावर मी वर्कप्लेसमध्येच कपडे बदलत होतो. तेव्हाच माझा कॅमेरा ऑन झाला. मी खरंच मनापासून सभागृहाच्या सर्व सदस्यांची माफी मागतो. ही नकळत झालेली चूक होती. आणि पुन्हा अशी चूक होणार नाही'.