टोरंटोमध्ये पायी जाणाऱ्या नागरिकांना व्हॅनने चिरडलं; 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 07:20 IST2018-04-24T07:20:44+5:302018-04-24T07:20:44+5:30

अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत.

canada van hits over a dozen pedestrians in toronto 9 dead 16 injured | टोरंटोमध्ये पायी जाणाऱ्या नागरिकांना व्हॅनने चिरडलं; 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

टोरंटोमध्ये पायी जाणाऱ्या नागरिकांना व्हॅनने चिरडलं; 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

टोरंटो- कॅनडाच्या टोरंटोमध्ये एका व्हॅनने पायी जाणाऱ्या नागरिकांना चिरडलं. या अपघातात  10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. 16 जखमींवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

टोरंटोच्या योंग स्ट्रीट आणि फिंच अव्हेन्यू परिसरात ही घटना घडली असून.स्थानिक वेळनुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर व्हॅनच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता, पण कॅनडा पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. पोलिसांनी नागरिकांना अपघातस्थळापासून दूर राहण्याचं आवाहन केलं असून घटनेची चौकशी सुरू आहे. डेप्युटी पोलीस चीफ पीटर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. 



 



 

Web Title: canada van hits over a dozen pedestrians in toronto 9 dead 16 injured