शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जपान मैत्रीला जागला, इतर मित्रांनीही दिली भारताला साथ! कॅनडाला बसला मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 16:56 IST

'क्वाड'च्या बैठकीत कॅनडाच्या खेळ फसला, नक्की काय झालं?

Canada India Khalistan Row: खलिस्तानच्या मुद्द्यावरून कॅनडा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा विरोध करण्यात व्यस्त आहे. पण त्यांचा एकही प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही. शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जपानने अद्याप यावर सहमती दर्शवलेली नाही. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजन्सींचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. जपानने मात्र यावर प्रतिक्रिया न देता, कॅनडाला मोठा झटका दिला आहे.

क्वाडमध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका यांचा समावेश आहे. कॅनडा या गटात नसला तरी हा मुद्दा उपस्थित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घडामोडींशी संबंधित एका व्यक्तीने 'इटी'ला सांगितले की, निज्जर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारत याच्या बाजूने नाही आणि जपानही यासाठी तयार नाही. या विषयावर चर्चा करण्यासाठी क्वाड हे व्यासपीठ नाही असे जपानलाही वाटते. असे सांगण्यात येत आहे की क्वाडचा आदेश पूर्णपणे वेगळा आहे आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत एक सुरक्षित इंडो पॅसिफिक प्रदेश तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

जपान मैत्रीला जागला! इतर मित्रही भारतासोबत...

जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपांवर भारत शांतपणे जागतिक शक्तींसमोर आपली भूमिका मांडत आहे. क्वाड हे एक धोरणात्मक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. क्वाड नेत्यांची तिसरी वैयक्तिक बैठक हिरोशिमा येथे झाली. या बैठकीत इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या अनेक मुद्द्यांवर एकमत झाले. यासोबतच इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या लष्करीकरणावरही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. या आठवड्यात कॅनडाने निज्जरच्या हत्येप्रकरणी जी-7 देशांनी संयुक्त निवेदन जारी करण्याची सूचना केली होती. तेव्हाही G-7 चे विद्यमान अध्यक्ष असलेल्या जपानने कॅनडाचा हा हेतू थांबवला होता. तसेच फ्रान्स आणि इटलीनेही कॅनडाचे समर्थन केले नाही.

भारताला पुरावे दिल्याचा कॅनडाचा दावा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले की, हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारतीय हस्तकांचा सहभाग असल्याबद्दल 'विश्वसनीय आरोप' करण्यासाठी कॅनडाने अनेक आठवड्यांपूर्वी भारतासोबत पुरावे सामायिक केले होते आणि या गंभीर मुद्द्यावर नवी दिल्लीने कारवाई करावी अशी कॅनडाची इच्छा आहे. तथ्यांच्या तळापर्यंत जाण्यासाठी ओटावा सोबत काम करत आहे'. 18 जून रोजी ब्रिटीश कोलंबियामध्ये खलिस्तानी फुटीरतावादी नेता निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा 'संभाव्य' सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आहे, ज्यामुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतJapanजपानFranceफ्रान्सJustin Trudeauजस्टीन ट्रुडो