बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा पक्ष निवडणूक लढवू शकतो? निवडणूक आयोग म्हणाले,'आम्ही स्वतंत्र आहोत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 17:24 IST2025-01-01T17:21:34+5:302025-01-01T17:24:27+5:30
बांगलादेशात शेख हसीना यांचा पक्ष निवडणूक लढवू शकतो. बांगलादेशातील निवडणूक आयोगाने याबाबतीत भाष्य केले आहे.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा पक्ष निवडणूक लढवू शकतो? निवडणूक आयोग म्हणाले,'आम्ही स्वतंत्र आहोत..."
बांगलादेशात शेख हसीना यांचा पक्ष आता निवडणूक लढवू शकतो. याबाबत आता बांगलादेशातील निवडणूक आयोगाने भाष्य केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नसीरुद्दीन यांनी म्हटले आहे की, सरकार किंवा न्यायव्यवस्था बंदी घालत नाही तोपर्यंत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग निवडणुकीत भाग घेऊ शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त यांनी सोमवारी चितगाव सर्किट हाऊस येथे निवडणूक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली.
एएमएम नसीरुद्दीन म्हणाले की, निवडणूक आयोग पूर्ण स्वातंत्र्याने काम करतो आणि कोणत्याही बाह्य दबावाला सामोरे जात नाही. निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. सीईसीने मागील निवडणुकांमध्ये बनावट मतदारांचा मुद्दा देखील मान्य केला आणि मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झाल्यामुळे मतदार नोंदणी कमी झाली.
मतदार यादी अपडेट करण्याचे काम लवकरच सुरू करण्याच्या योजनेची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. हे काम सहा महिन्यांत होणे अपेक्षित आहे. ५ ऑगस्टपासून निवडणूकविषयक बाबींवर राष्ट्रीय सहमती वाढवण्यात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. मागील पॅटर्नवर यावेळी निवडणुका होणार नाहीत.
काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने म्हटले होते की, मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी मतदानाचे किमान वय १७ वर्षे ठेवण्याच्या सूचनेमुळे निवडणूक आयोगावर दबाव येईल आणि निवडणूक प्रक्रियेला विलंब होऊ शकतो.