आता भारतात आल्यावर अमेरिकेच्या व्हिसाचं नुतनीकरण करू शकतो का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 10:00 IST2020-12-05T10:00:00+5:302020-12-05T10:00:01+5:30
व्हिसाधारकाकडे वैध आय-२० (विद्यार्थ्यांसाठी) किंवा आय-७९७ (एच१बी आणि अस्थायी कर्मचारी) असेपर्यंत ते अमेरिकेत राहू शकतात.

आता भारतात आल्यावर अमेरिकेच्या व्हिसाचं नुतनीकरण करू शकतो का?
प्रश्न: मी भारतीय नागरिक असून सध्या नोकरी/कामासाठी अमेरिकेत असतो. मी थोड्या दिवसांसाठी भारतात येण्याच्या विचारात आहे. भारतात असताना मी अमेरिकेच्या दूतावासात किंवा वकिलातीत व्हिसा नुतनीकरण करू शकतो का?
उत्तर: सध्या अमेरिकेच्या भारतातील सर्व दूतावासांमध्ये मर्यादित आणि अत्यावश्यक स्वरुपाच्या व्हिसा सेवा उपलब्ध आहेत. आपत्कालीन अपॉईंटमेंटसाठीही मोठ्या प्रमाणात वेटिंग असल्यानं या हिवाळ्यात भारतात व्हिसा नुतनीकरणासाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तींनी जास्त दिवस तिथे राहावं. व्हिसाधारकाकडे वैध आय-२० (विद्यार्थ्यांसाठी) किंवा आय-७९७ (एच१बी आणि अस्थायी कर्मचारी) असेपर्यंत ते अमेरिकेत राहू शकतात. त्यांच्या अमेरिकेच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही त्यांना वास्तव्य करता येतं. मुदत संपलेल्या व्हिसासह देश सोडल्यानंतर पुन्हा अमेरिकेत प्रवेश करताना नव्या व्हिसाची गरज भासते.
प्रश्न: मला आताच स्टुडंड व्हिसा मिळाला. पण कोविड-१९ मुळे विद्यापीठानं वर्ग सुरू करण्याची तारीख पुढे ढकलली. मी माझ्या व्हिसाचा वापर करून प्रवास करू शकतो का?
उत्तर: तुमच्याकडे वैध आय-२० असेपर्यंत आणि तुमचं सेविस आयडी बदललेलं नसेपर्यंत तुमचा स्टुडंट व्हिसा वैध असतो. तुमच्या व्हिसावर तो कधीपर्यंत वैध आहे, याबद्दलची तारीख दिलेली असते. जर तुमच्या सेविस कार्डमध्ये बदल झाला असल्यास तुम्ही नव्या व्हिसासाठी अर्ज करायला हवा. तुमच्या अपडेटेड आय-२० मध्ये देण्यात आलेल्या तारखेच्या ३० दिवसांपेक्षा आधी तुम्ही अमेरिकेत प्रवेश करू शकत नाही.
तुमच्या आय-२० फॉर्मवरील वैयक्तिक माहितीत किंवा सेविस खात्यात बदल झाला असल्यास नव्या स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करा, असं आम्ही सुचवतो. सेविस खात्यातील स्टेटस व्यवस्थित असावं यासाठी अमेरिकेच्या बाहेर जाण्याआधी किंवा बाहेर असताना तुमच्या विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कार्यालयाचा सल्ला घ्या आणि गरज असल्यास नवा आय-२० फॉर्म मिळवा.
व्हिसामुळे परदेशी नागरिक अमेरिकेपर्यंत पोहोचून अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी विनंती करू शकतात. पण व्हिसा असल्यावर तुम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळेलच याची खात्री नाही. अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाकारायचा याचा निर्णय होमलँड सिक्युरिटी विभाग (डीएचएस), अमेरिकेचा कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) अधिकारी घेतात. याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही www.cbp.gov आणि www.dhs.gov या संकेतस्थळांना भेट देऊ शकता.